प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात महत्त्वपूर्ण बदल, परेड ते कोरोना चाचणी, नेमके बदल कोणते?
या पार्श्वभूमीवर यंदा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अनेक बदल करण्यात आले आहेत. (Major Changes In Republic Day Programme)
नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूची नवी प्रजाती समोर आली आहे. यानंतर जगभरातील सर्वच देशांचे धाबे दणाणले आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अनेक बदल करण्यात आले आहेत. नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलन हे ठराविक अंतरापर्यंत करण्यात येणार आहे. यंदा प्रजासत्ताक दिनाचे संचलन हे विजय चौकातून नॅशनल स्टेडियमपर्यंत केले जाणार आहे. दरवर्षी हे संचलन राजपथापासून लाल किल्ल्यापर्यंत काढली जाते. (Major Changes In Republic Day Programme)
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना काळात प्रजासत्ताक दिनी करण्यात येणारे संचलनात अनेक बदल केले आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचे संचलन हे 8.2 किलोमीटरपर्यंत केले जाते. मात्र यंदा प्रजासत्ताक दिनाचे संचलन हे केवळ 3.3 किलोमीटरपर्यंत करण्यात येणार आहे. त्यासोबत यंदा या कार्यक्रमासाठी फक्त 25 हजार लोकांना उपस्थित राहता येणार आहे. दरवर्षी ही संख्या 1 लाख 15 हजार इतकी असते. तसेच यंदा 32 हजार तिकीटांच्या ऐवजी फक्त 7500 तिकीटांची विक्री केली जाणार आहे.
15 वर्षाखालील लहान मुलांना सहभागी होता येणार नाही
यंदा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी विविध राज्यातील चित्ररथामध्ये लहान मुलांचा समावेश असतो. मात्र यंदा या कार्यक्रमात लहान मुलांना सहभागी होता येणार नाही. केवळ 15 वर्षावरील लहान मुलांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होता येईल. त्यासोबतच दिव्यांग मुलांनाही या कार्यक्रमात सहभाही होता येणार नाही. तसेच यंदाच्या संचलनात केवळ बसून बघता येईल, इतकेच लोक सहभागी होऊ शकणार आहेत. (Major Changes In Republic Day Programme)
परेडमधील प्रत्येकाची कोरोना चाचणी
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संचलनादरम्यान कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन केले जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी यंदा परेडमधील पथकात सहभागी होणाऱ्यांची संख्या कमी करण्यात येणार आहे. यापूर्वी प्रत्येक पथकात 144 लोकांचा सहभाग असायचा. यंदा मात्र ही संख्या 96 इतकी असणार आहे. या परेडमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला मास्क घालणे गरजेचे असणार आहे. परेडमधील प्रत्येकाची कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना अलगीकरणात ठेवले जाणार आहे.
प्रत्येक गेटवर थर्मल स्क्रीनिंग
त्याशिवाय प्रजासत्ताक दिनाच्या प्रत्येक गेटवर थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार आहेत. त्याशिवाय 300 हून अधिक ठिकाणी सॅनिटायझर ठेवले जाणार आहे. त्यासोबत कोव्हिड बूथ, डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफही हजर असणार आहे. (Major Changes In Republic Day Programme)
संबंधित बातम्या :
कोरोना व्हायरसचा नवा अवतार सुस्साट; ब्रिटनमधून थेट ‘या’ 19 देशांमध्ये पोहोचला
सर्चमध्ये भलतीचं उत्तरं, गुगलला कोर्टात खेचण्याच्या पाकिस्तानच्या हालचाली