सुरतमध्ये कोरोनामुळे हाहा:कार; स्मशानात रांगा; मृतदेह दहनाने विद्युतदाहिन्यांची धुरांडी वितळली

स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्यांवर इतका ताण आला आहे की, चितांच्या उष्णतेमुळे विद्युतदाहिन्यांची धुरांडीही वितळली आहेत. | coronavirus deaths in surat gujrat

सुरतमध्ये कोरोनामुळे हाहा:कार; स्मशानात रांगा; मृतदेह दहनाने विद्युतदाहिन्यांची धुरांडी वितळली
सुरतच्या स्मशानभूमींमध्ये 24 तास अंत्यसंस्कार
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 8:28 AM

सुरत: कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याची वेळ ओढावली आहे. कोरोना रुग्णांची (Coronavirus) झपाट्याने वाढणारी संख्या ही धडकी भरवणारी आहे. ही परिस्थिती एकट्या महाराष्ट्रातच नव्हे तर शेजारच्या गुजरातमध्येही (Coronavirus in Gujrat) अनुभवायला मिळत आहे. (Spike in COVID Deaths Results in Melting of Gas Furnaces in Surat Crematoriums)

गुजरातमधील व्यापाराचे मुख्य केंद्र असलेल्या सुरतमध्ये कोरोनाच्या प्रकोपामुळे हाहा:कार उडाला आहे. याठिकाणी रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढला आहे. मृतांची संख्या प्रचंड असल्याने सुरतच्या स्मशानभूमींमध्ये 24 तास अंत्यसंस्कार सुरु आहेत. यामुळे स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्यांवर इतका ताण आला आहे की, चितांच्या उष्णतेमुळे विद्युतदाहिन्यांची धुरांडीही वितळली आहेत. शेजारच्या बरडोली शहरातदेखील अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता गुजरातमध्ये कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.

गेल्या आठ-दहा दिवसांपासून स्मशाभूमींमध्ये अहारोत्र मृतदेह जळत आहेत. अश्विनीकुमार आणि रामनाथ घेला या दोन स्मशानभूमींमध्ये मृतदेहांचा ओघ जास्त आहे. जवळपास 16 विद्युतदाहिन्यांमध्ये दररोज 100 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याची माहिती येथील प्रशासनाने दिली.

स्मशानभूमीतील मृतदेहांची संख्या चारपटीने वाढली

स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्या अविरत काम करत असल्याने त्यांच्यात बिघाड व्हायला सुरुवात झाली आहे. यापूर्वी दिवसाला आमच्या स्मशानभूमीत 20 मृतदेह येत असत. यापैकी काही मृतदेहांना लाकडांवर अग्नी दिला जात असे. तर उर्वरित मृतदेहांचा दाहसंस्कार विद्युतदाहिनीमध्ये होत असे.

मात्र, सध्याच्या घडीला स्मशानभूमीत दिवसाला 80 मृतदेह येत आहेत. त्यामुळे स्मशानभूमीतील सर्व विद्युतदाहिन्या धगधगत्या राहत आहेत. आम्ही थोडाथोडावेळाने प्रत्येक विद्युतदाहिनीचा वापर करत असलो तरी मृतदेहांची संख्याच इतकी जास्त आहे की, या विद्युतदाहिन्या सतत सुरु आहेत. त्यामुळेच या विद्युतदाहिन्यांच्या चिमण्या उष्णतेने वितळल्याची माहिती रामनाथ गेल्हा स्मशानभूमीतील अधिकाऱ्याने दिली.

संबंधित बातम्या:

PHOTO : बिनकामाचे घराबाहेर पडण्यापूर्वी या चिता बघा, नगरमध्ये मृतदेहांचे खच, एकाचवेळी 22 अंत्यसंस्कार

Video | अहमदनगरमध्ये मृतदेहांचा खच, एकाचवेळी तब्बल 22 जणांना अग्नी, दिवसभरात 42 अंत्यसंस्कार

(Spike in COVID Deaths Results in Melting of Gas Furnaces in Surat Crematoriums)

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.