ढील दे, ढील दे दे रे भैया… अमित शाह यांचा कापला की पतंग, मकर संक्रांतीची अहमदाबादमध्ये लुटला आनंद

Home Minister Amit Shah flies kites : मकर संक्रांतीचा जल्लोष देशभर सुरू आहे. मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचा उत्साह काही औरच असतो. उत्तरायणाच्या या पर्वात देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे सुद्धा सहभागी झाले.

ढील दे, ढील दे दे रे भैया... अमित शाह यांचा कापला की पतंग, मकर संक्रांतीची अहमदाबादमध्ये लुटला आनंद
अमित शाह यांनी उडवला पतंग
Follow us
| Updated on: Jan 14, 2025 | 3:51 PM

मकर संक्रांतीचा देशभरात उत्साह दिसून येत आहे. या उत्सवाहात पतंग उडवण्याची मजा काही औरच आहे. उत्तरायणाच्या या पर्वात देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांना सुद्धा मोह आवरला नाही. त्यांनी पतंगाची दोर हातात घेतली. पतंगांनी भरलेल्या आकाशात त्यांच्या पतंगाने भरारी घेतली. ढील दे, ढील दे दे रे भैया… इस पतंग को ढील दे असा माहोल तयार झाला नी त्यांच्याच एका समर्थकाने त्यांचा पतंग कापला. त्यावेळी एकच जल्लोष झाला. पतंग कापल्यानंतर अमित शाह यांनी तो कुठे हरवला हे सुद्धा निरीक्षण केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे पण उपस्थित होते.

उत्तरायण पतंग महोत्सवात सहभागी

हे सुद्धा वाचा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल या दोघांनी अहमदाबाद शहरात मकर संक्रांतीचा उत्सव आठवणीत साठवला. अमित शाह आणि भूपेंद्र पटेल हे अहमदाबाद शहरातील ‘उत्तरायण पतंग महोत्सवात’ सहभागी झाले. यावेळी त्यांनी स्थानिक लोकांशी चर्चा केली. याठिकाणी त्यांच्या समर्थकांनी आणि जनतेने त्यांचे स्वागत केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचा आनंद लुटला. यावेळी एकच जल्लोष झाला.

समर्थकानेच कापली पतंग

अमित शाह हे एका इमारतीच्या छतावर दिसत आहेत. ते पतंग उडवत आहेत. आजूबाजूचे लोक जल्लोष करत आहेत. तर केंद्रीय गृहमंत्र्यांना पतंग उडवताना पाहण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर लोकांनी गर्दी केल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे अमित शाह यांच्याजवळ उभे होते. तर अमित शाह हे पतंग उडवत होते. हा जल्लोष सुरू असतानाच शेजारील इमारतीवरील एका तरुणाने अमित शाह यांचा पतंग कापला. पतंग कापल्याचे शाह यांच्या लगेच लक्षात आले. त्यांनी त्या तरुणाचा पण तात्काळ नजरेने शोध घेतला. अमित शाह यांनी या तरुणाकडे इशारा केल्याचे दिसून आले.

अमित शाह यांच्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सकाळी मकर संक्रांतीच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या. मकर संक्रांती, भारतीय संस्कृती आणि पंरपरेतील श्रद्धेचे एक प्रतिक आहे, देशातील नागरिकांची ऊर्जा, उत्साह आणि प्रगती साधणाऱ्या या सणाच्या शुभेच्छा असे ट्वीट त्यांनी केले.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...