Pakistan Embassy : पाकिस्तानी दुतावासात कर्मचाऱ्याचे नापाक कृत्य; भारतीय महिलेसोबत छेडछाड

Indian Woman : पाकिस्तानी दुतावासात एका भारतीय महिलेची छेडछाड काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकरणात पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानी नागरिक मिन्हाज हुसैन याला देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Pakistan Embassy : पाकिस्तानी दुतावासात कर्मचाऱ्याचे नापाक कृत्य; भारतीय महिलेसोबत छेडछाड
पाकिस्तानी दुतावासात नापाक कृत्य
Follow us
| Updated on: Jul 06, 2024 | 11:34 AM

नवी दिल्लीतील पाकिस्तानी दुतावासात नापाक कृत्य घडले. या दुतावासात काम करणाऱ्या भारतीय महिलेशी छेडछाड करण्यात आल्याचे समोर आले आहे. यापूर्वी दुतावासाचा अधिकारी साद अहमद वाराईच याच्याकडे महिलेने फिर्याद केली होती. पण त्याने कर्मचाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा हा प्रकार घडल्यानंतर पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर मिन्हाज हुसैन या 54 वर्षीय नागरिकाला देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

स्वयंपाकी देत होता त्रास

मिन्हाज हुसैन हा पाकिस्तानी उच्चायुक्त पदाचे प्रभारी साद अहमद वाराईच यांचा स्वयंपाकी आहे. या ठिकाणी एक भारतीय महिला काम करते. ती साद अहमद यांच्या घरी स्वच्छता आणि स्वयंपाक घरात मदतनीस म्हणून काम पाहते. ती टिळक रस्त्यावरील वाराईच यांच्या अधिकृत निवासस्थानी असलेल्या सर्व्हंट क्वार्टरमध्ये राहत होती.

हे सुद्धा वाचा

पाच महिन्यांपासून त्रास

मिन्हाज हा फेब्रुवारीत पाकिस्तानमधून या ठिकाणी नोकरीसाठी आला. तेव्हापासून तो पीडितेची छेडछाड काढत होता. तिच्यावर लैंगिक संबंधासाठी दबाव टाकत होता. अश्लील शेरेबाजीला कंटाळून या महिलेने साद अहमद यांच्याकडे त्याची तक्रार केली होती. पण त्यांनी त्याला पाठीशी घातले. मिन्हाज बकरी ईदच्या निमित्ताने पाकिस्तानला गेला. 30 जूनपर्यंत ही नोकरी आणि घर सोडण्याचे आदेश या विधवा महिलेला देण्यात आले. तर मिन्हाज याला पुन्हा भारतात बोलविण्यात आले.

28 जून रोजी तक्रार

या अमानुष व्यवहारानंतर महिलेने 28 जून रोजी टिळकमार्ग पोलीस ठाण्यात मिन्हाज हुसैन याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्याआधारे आरोपी मिन्हाज अहमद हुसैन याच्याविरोधात IPC कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अडचणी वाढल्यानंतर मिन्हाजला पाकिस्तानी दुतावासाने मायदेशी रवाना केले. त्याच्यावर कोणतीही कार्यवाही दुतावासाने केली नाही. यापूर्वी तक्रार दिली असता कर्मचाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न दुतावासाने केला.  यापूर्वी पण पाकिस्तानला जाणाऱ्या एका प्राध्यापक महिलेकडे दुतावासातील कर्मचाऱ्यांनी शारिरीक सुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता या घटनेने पाकिस्तानी दुतावासातील अधिकाऱ्यांची प्रवृत्ती समोर आली. अधिकाऱ्यांची आणि दुतावासाची नाचक्की झाली.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.