नवी दिल्लीः काँग्रेस पक्षात आजपासून एका नव्या युगाला सुरुवात होत आहे. मागील 24 वर्षांनंतर पक्षाची कमान गांधी घराण्या बाहेरील व्यक्तिकडे अध्यक्षपदाची (Congress President) सूत्रं दिली गेली आहेत. नुकतीच अध्यक्षपदी निवड झालेल्या मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात आयोजित केलेल्या शानदार कार्यक्रमात दिग्गजांच्या उपस्थितीत अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.
अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसच्या गौरवशाली भूतकाळाचा इतिहास मांडला. यावेळी कार्यकर्त्यांनी संघटित होऊन एकत्रित पण काम करण्याची गरज असल्याचे मत मांडले.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी पदाचा कार्यभार दिल्यानंतर अनेक काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. त्यामुळे यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधींनीही आपल्या भाषणात अनेक गोष्टी सांगितल्या.
माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे काँग्रेसची कमान सोपवल्यानंतर त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना त्यांनी त्या म्हणाल्या की, मल्लिकार्जुन खर्गे अध्यक्ष झाल्यानंतर मला खूप हायसे आणि आनंदही वाटत आहे.
त्या पुढे हेही म्हणाल्या की, आज नवीन अध्यक्षांनी पदभार स्वीकारला असल्यानेच मी आत माझ्या जबाबदारीतून मुक्त झालो आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकाल्यानंतर सोनिया गांधींनी त्यांना शुभेच्छा तर दिल्याच पण त्याच वेळी त्यांनी पदाची जबाबदारी सांगितली.
पदाची जबाबदारी सांगताना त्या म्हणाल्या की, मल्लिकार्जुन खर्गे यांना आता आराम मिळणार नसल्याचे सांगताच सगळ्या नेत्यांमध्ये हशा पिकला.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसची कमान हाती घेतल्यानंतर त्यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, गांधी परिवार हेच आमचे कायम मार्गदर्शक राहिले आहेत.
गांधी घराण्याचे मार्गदर्शन नेहमीच मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी प्रियांक खर्गे म्हणाले की, खर्गे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे तळागाळीतील कार्यकर्त्यांना आनंद झाला आहे. त्यामुळे कर्नाटकातील प्रत्येक कार्यर्त्याला त्यांचा अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षपदाच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर अध्यक्ष पदावरुन रबरी स्टॅम्प अशी टीका भाजपने केली होती, मात्र या टिकेला खर्गे उत्तर देतील असंही प्रियांक खर्गे यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षावर निशाणा साधताना प्रियांक खर्गे म्हणाले की, मल्लिकार्जुन खर्गे हे निवडणूक जिंकून पक्षाचे अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे भाजपला बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचेही त्यांनी सांगितले.