कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये (West Benal) झालेल्या हिंसाचारात 16 जणांचा मृत्यू झालाय. मुख्यमंत्री ममता बनर्जी (Mamata Banerjee) यांनी या हिंसेतील मृतांच्या (Violence) कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये देण्याची घोषणा केलीय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (6 मे) नबान्नमध्ये पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. राजकीय हिंसाचारात आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झालाय. यात निम्मे भाजपचे तर निम्मे टीएमसीचे समर्थक आहेत. याशिवाय संयुक्त मोर्चाच्या एका समर्थकाचाही मृतांमध्ये समावेश आहे. “सरकार कोणत्याही जाती आणि धर्मात भेदभाव करत नाही, तर सर्वांना सारख्याच दृष्टीकोनातून पाहते,” असं मत ममता बॅनर्जींनी यावेळी व्यक्त केलं (Mamata Banerjee announce financial help to violence affected families).
ममता बॅनर्जी म्हणाल्या, “24 तासापूर्वी मी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलीय. त्यानंतर लगेचच केंद्रीय पथक पाठवण्यात आलंय. पश्चिम बंगालमध्ये खोटे व्हिडीओ पसरवले जात आहेत. बंगालची बदनामी केली जात आहे. बंगालच्या आया-बहिणींची बदनामी कधीही सहन केली जाणार नाही. त्यांचा सन्मान हिमालयापेक्षा मोठा आहे. त्यामुळे आई-बहिणींचा सन्मान कमी होऊ दिला जाणार नाही.”
“केंद्रीय मंत्र्यांनी पश्चिम बंगालमध्ये भडकावण्याचं काम बंद करावं”
“पश्चिम बंगालमध्ये कुणीही दंगल भडकावण्याचा प्रयत्न केला तर ते सहन केलं जाणार नाही. केंद्रीय मंत्री स्वतः लोकांना भडकावत आहेत. असं करुन कसं चालेलं. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने भाजपच्या मुख्यमंत्र्यांना अफवा पसरवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यातूनच बंगालचे लोक आसाममध्ये पलायन करत असल्याचं सांगितलं जात आहे.”
हेही वाचा :
BLOG : दिदीगिरीची हॅट्रीक… मोदींचा विजयी अश्वमेध रथ रोखणारी वाघीण…
महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन
व्हिडीओ पाहा :
Mamata Banerjee announce financial help to violence affected families