‘दादा’साठी ममता मैदानात; पंतप्रधानानांच केली विनंती, म्हणाल्या…
ममता बॅनर्जींनी सौरव गांगुलीला आयसीसी निवडणूक लढवण्याची परवानगी देण्याची विनंती थेट विनंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच केली आहे.
नवी दिल्लीः भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Former Captain Sourav Ganguly) यांनी बीसीसीआयच्या (BCCI) अध्यक्षपदावरून आऊट झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच (CM Mamata Banraji) थेट मैदानात उतरल्या आहेत. पश्चिम बंगालच्या या दादासाठी त्यांनी जोरदार बॅटिंग केली आहे. ममत बॅनर्जी यांनी सौरव गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून काढून टाकणे हा त्यांच्यावर अन्याय असल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे सौरव गांगुलीला आयसीसी निवडणूक लढवण्याची परवानगी देण्याची विनंती त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच केली आहे. सौरव गांगुलीला अध्यक्षपदावरुन काढून टाकल्यामुळे या प्रकरणात नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा अशीही मागणी केली आहे.
ममता बॅनर्जी यांनी सौरव गांगुली हा आमच्या राज्याचा अभिमान आणि स्वाभिमान असल्याचेही म्हटले आहे. सौरव गांगुलीने मैदानावरही आणि उत्तम प्रशासक म्हणूनही त्यांनी आपली क्षमता दाखवून दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सौरव गांगुलीला पदावरुन हटवण्यात आले मात्र अमित शहांच्या मुलाला का वगळण्यात आले हे अजून स्पष्ट झाले नाही असा टोलाही त्यांनी अमित शहांना लगावला आहे.
मैदानावर आणि प्रशासनावर पकड असलेल्या सौरव गांगुलीला चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
सौरव गांगुलीच्या अध्यक्ष पदावरुन पेटलेल्या राजकारणात ममता बॅनर्जींनी उडी घेत या प्रकरणात पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.
त्या बरोबरच सौरव गांगुलीला आयसीसी निवडणूक लढवण्याची परवानगी देण्याची विनंतीही मी पंतप्रधानांन नरेंद्र मोदींना करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.