“भाजप माओवाद्यांपेक्षा भयंकर”,ममता बॅनर्जींचा घणाघाती आरोप

ममता बॅनर्जींनी भाजप माओवाद्यांपेक्षा जास्त धोकादायक असल्याचा आरोप केला आहे. ( Mamata Banerjee BJP Maoists)

भाजप माओवाद्यांपेक्षा भयंकर,ममता बॅनर्जींचा घणाघाती आरोप
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 5:13 PM

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपा माओवाद्यांपेक्षा भंयकर पार्टी असल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी केली. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध सर्वे दाखवले जात आहेत. हे सर्व्हे ममता बॅनर्जींनी नाकारले आहेत. ओपिनियन पोलमधील अंदाजाच्या चार पट जागा तृणमूल काँग्रेस मिळवेल, असा दावा ममता बॅनर्जींनी केला. (Mamata Banerjee criticize BJP dangerous like  Maoists)

भाजप खोटा प्रचार करतं

ममता बॅनर्जींनी पुरालिया येथील सभेत भाजप खोटा प्रचार करत असल्याचा हल्लाबोल केला. भाजप फेक व्हिडीओ पसरवत, फेक व्हॉटस अप ग्रुप बनवत. चुकीची माहिती पसरवतं. भाजप माओवाद्यांपेक्षा भंयकर असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. भाजप आणि केंद्र सरकारवर हल्ला चढवत ममता बॅनर्जींनी राज्यात तृणमूल काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा दावा केला.

लोकसभा निवडणुकीनंतर भाजप पळून गेले

भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या वेळी विकासाबद्दलचे मोठे दावे केले होते. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपवाले बंगालमधून पळून गेले आहेत. भाजपाले निवडणुकीपूर्वी मिठाई देण्याची आश्वासनं देत आहेत. भाजप केवळ खोट बोलण्याचं काम करते. झारखंड आणि ओडीशामध्ये भाजप सत्तेत नाही.

माध्यमांवर दबाव आणला जातोय

बंगालच्या निवडणुकीपूर्वी वेगवेगळे पोल दाखवले जात आहेत. भाजप माध्यमांना भीती दाखवत आहे. माध्यमांना इन्कम टॅक्स विभागाची भीती दाखवण्याचं काम करत आहे. योग्य गोष्टीला अयोग्य आणि अयोग्य गोष्टीला योग्य दाखवण्यासाठी दबाव टाकला जात आहे. यामुळे माध्यमांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन ममत बॅनर्जींनी केलं आहे. भाजप माओवाद्यांपेक्षा भंयकर आहे. भाजप अजगर, किंग कोब्रा आहे, सर्व काही हडप करतात, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला आहे.

बंगालची विक्री होऊ देणार नाही

भाजप दगाबाज आहे जनतेने त्यांना मतदान करु नये. दररोज धमकावलं जात आहे. बंगालची विक्री होऊ देणार नाही. भाजपसमोर बंगाल कधीच झुकणार नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजण्यापूर्वीच बंगालमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ज्या नंदीग्राममध्ये भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला भगदाड पाडलं त्याच ठिकाणी ममता बॅनर्जी विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. ममता बॅनर्जींनी त्यांचे जुने सहकारी सुवेंदू अधिकारी यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्याच्याच विरोधात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जींचा हा निर्णय कितपत यशस्वी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या:

जिथं भाजपानं भगदाड पाडलं, तिथंच ममतांनी रणशिंग फुंकलं; कोण चितपट होणार?

महाराष्ट्राला एक इंचही जमीन मिळू देणार नाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

(Mamata Banerjee criticize BJP dangerous like Maoists)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.