Mamata banerjee Injured : ममता बॅनर्जींचे सुरक्षा संचालक निलंबित, जिल्हाधिकारी आणि एसपींवरही कारवाई

मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना झालेल्या दुखापतीमुळे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणात 3 बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई केलीय.

Mamata banerjee Injured : ममता बॅनर्जींचे सुरक्षा संचालक निलंबित, जिल्हाधिकारी आणि एसपींवरही कारवाई
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 6:46 PM

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना झालेल्या दुखापतीमुळे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणात 3 बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई केलीय. त्यात ममता बॅनर्जी यांचे सुरक्षा संचालक, जिल्हाधिकारी आणि एसपींचा समावेश आहे.(Action taken against 3 senior officials for breach of security of Mamata Banerjee)

नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला आणि त्यात त्यांच्या पायाला दुखापत झाल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसनं केला आहे. त्यावर ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचे कुठलेही पुरावे नसल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय. ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला नाही तर त्यांचा अपघात झाल्याचं एका अहवालातून समोर आल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठा हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवत निवडणूक आयोगाने बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे.

कोणकोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई?

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा संचालक विवेक सहाय यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर पुढील 7 दिवसांत त्यांच्यावर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. इतकंच नाही तर पूर्व मेदिनीपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे. तसंच एसपींवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा संचालक विवेक सहाय यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा होती. पण त्यात कुठेतरी कमतरता निर्माण झाली आणि ते आपल्या कर्तव्यात कमी पडले, असा ठपका ठेवत त्यांच्यावर आठवड्याभरात गुन्हा नोंदवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने पूर्व मेदिनीपूरचे डीएम आणि डीईओ विभू पांडेय यांची बदली केली आहे. त्यांना निवडणूक व्यतिरिक्त काम देण्यात आलं आहे. त्यांच्या जागी स्मिता पांडेय यांच्याकडे डीएम पदाचा कारभार देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पूर्व मेदिनीपूरचे एसपी प्रवीण प्रकाश यांनाही निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना झालेली दुखापत अधिकाऱ्यांना चांगलीच महागात पडली आहे.

हल्ला नाही अपघात!

ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये हल्ला झाल्याचे कोणतेही पुरवे नसल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय. पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि अन्य दोन विशेष निवडणूक अधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आलेल्या अहवालावरुन निवडणूक आयोगाने म्हटलं आहे की, ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. ममता बॅनर्जी यांना झालेल्या दुखापत ही कुठल्याही हल्ल्यातून झाली नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

अहवालानुसार ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये कुठल्याही प्रकारचा हल्ला झालेला नाही. त्यांना झालेली दुखापत ही छोट्याशा अपघातामुळे झाल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. स्पेशल ऑब्जर्व्हर अजय नायक यांनी दिलेल्या अहवालानुसार निवडणूक आयोगाने असं म्हटलं आहे. हा अहवाल शनिवारी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला. यापूर्वी देण्यात आलेल्या अहवालावर निवडणूक आयोग असमाधानी होतं. त्या अहवालात ममता बॅनर्जी यांना दुखापत नेकमी कोणत्या कारणामुळे झाली, हेच सांगितलं गेलं नव्हतं. त्यामुळे निवडणूक आयोगाने याबाबत एक सविस्तर अहवाल मागवला होता.

संबंधित बातम्या :

Mamata Banerjee Injured : ममता बॅनर्जींवर हल्ला नाही तर अपघात! हल्ल्याचे पुरावे नाहीत- निवडणूक आयोग

ममतांना प्लॅस्टर, भाजपला दुखणं, सामनातून भाजपवर शरसंधान

दिदीची विचारपुस करण्यासाठी भाजप नेते हॉस्पिटलमध्ये, तर TMC ची निवडणूक आयोगाकडे तक्रार, वाचा सविस्तर

Action taken against 3 senior officials for breach of security of Mamata Banerjee

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.