पुतणीच्या लग्नात नाचतानाच काकाचा झाला मृत्यू, लग्नघरात पसरली शोककळा ! Video व्हायरल

पुतणीच्या लग्नात स्टेजवर डान्स करत असलेल्या 52 वर्षीय व्यक्तीचा नाचताना अचानक खाली पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे आनंदाने गजबजलेले लग्नघर क्षणात दु:खात बुडाले.

पुतणीच्या लग्नात नाचतानाच काकाचा झाला मृत्यू, लग्नघरात पसरली शोककळा ! Video व्हायरल
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 9:19 AM

रायपूर : छत्तीसगडमधील भिलाई येथून एक वेदनादायक घटना समोर आली आहे. तिथे लग्न समारंभात (dancinng at wedding) डान्स करताना एका व्यक्तीला आपला जीव गमवावा (man died while dancing) लागला. मृत व्यक्ती त्यांच्या पुतणीच्या लग्नात डान्स करत होते. मात्र नाचता-नाचताच त्यांना हृदयविकाराचा झटका (heart attack) आला आणि स्टेजवरच झाला खाली कोसळले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मृत दिलीप दल्ली हे राजहरा येथील विद्युत अभियांत्रिकी विभागात सहायक अभियंता होते.

52 वर्षीय दिलीप स्टेजवर पंजाबी गाण्यांवर जबरदस्त डान्स करत असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यांच्यासोबत वधू-वरही नाचत होते.. दिलीप अतिशय उत्साहाने नाचत होते. मात्र एवढ्या आनंदाच्या, उत्साहाच्या क्षणी एका झटक्यात असा दुर्दैवी प्रकार घडेल हे कोणालाच कळले नाही.

नाचता-नाचताच झाला मृत्यू

नातेवाईकांनी दिलेल्या माहिती नुसार, दिलीप हे 4 मे रोजी भाचीच्या लग्नासाठी गावी आले होते. लग्न लागल्यावर आनंदाच्या वातावरणात ते स्टेजवर जोरदार नाचत होते. अचानक त्यांना वेदना जाणवू लागल्याने ते स्टेजवर बसले पण थोड्या वेळाने ते खाली पडले. आजूबाजूला उपस्थित असलेल्या सर्व नातेवाइकांनी त्याला उचलून तपासणीसाठी रुग्णालयात नेले.

नाचताना आला हृदयविकाराचा झटका

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दिलीप यांच्या पश्चाक पत्नी व दोन मुली आहेत. या घटनेनंतर विवाहितेवर आणि लग्नघरातील सर्वांवरच शोककळा पसरली आहे. रडून रडून नातेवाइकांची अवस्थाही वाईट झाली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता त्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.