बंगळुरु : 10 वी, 12 वी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरच्या दृष्टीने दोन महत्वाची वर्ष आहेत. या इयत्तांमध्ये जितके गुण मिळतात, त्यावर विद्यार्थी कुठल्या शाखेला प्रवेश घेणार? कुठल्या क्षेत्रात तो करिअर करणार? ते चित्र स्पष्ट होतं. एखाद्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेताना, 10 वी, 12 वी मध्ये किती टक्के मार्क मिळाले? हे विचारलं, तर समजू शकतो. पण 12 वी च्या टक्केवारीवरुन तुम्हाला घर नाकारल जात असेल, तर तुम्ही काय म्हणालं?
देशाच्या एका प्रमुख शहरात हा प्रकार घडलाय. महत्वाच म्हणजे 12 व्या इयत्तेत अपेक्षित गुण नाहीत, म्हणून घर नाकारण्यात आलं. मुंबईत हाऊसिंग सोसायटीत एखाद्याला भाड्याने घर देताना बऱ्याच गोष्टी तपासल्या जातात.
घर मालकांच्या विचित्र मागण्या
आता शेजारच्या कर्नाटकातील बंगळुरुमध्ये 12 व्य़ा इय़त्तेत चांगले गुण नाहीत, म्हणून घर नाकारण्यात आलं. बंगळुरुत घराच्या किंमती प्रचंड आहेत. भाड्यावर घर घ्यायच झाल्यास घर मालकांच्या मागण्या सुद्धा विचित्र असतात. बंगळुरुमध्ये नव्याने आलेल्या लोकांना भाड्याच घर मिळवणं सोपं नसतं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय.
त्यापेक्षा आयआयटीची प्रवेश परीक्षा सोपी
बंगळुरुत घरांसाठी मागणी प्रचंड असून ती पूर्ण होण देखील तितकीच कठीण आहे. काही लोक म्हणतात, आयआयटीची प्रवेश परीक्षा त्यापेक्षा सोपी आहे. बंगळुरुर घर मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका माणसाने LinkedIn वर त्याचा असाच अनुभव शेअर केलाय. दुसऱ्या एका प्रोफेशनलला 12 व्या इयत्तेत कमी गुण आहेत, म्हणून घर नाकारण्यात आलं.
किती टक्के असतील, तर मिळणार ?
LinkedIn सदस्याने व्हॉट्स App चॅटचा एक स्क्रिनशॉट व्हायरल केलाय. ब्रोकरने घराच्या शोधत असलेल्या व्यक्तीकडे 12 वी ची मार्कशीट मागितली. त्यानंतर ब्रोकरने 12 वी त 75 टक्के गुण आहेत, म्हणून घर मालकाने नकार दिल्याच उत्तर दिलं. घर मालकाला 12 वी कमीत कमी 90 टक्के गुण मिळवणाऱ्या व्यक्तीला घर भाड्यावर द्यायच आहे.
व्हॉट्स App च्या या स्क्रिनशॉटला एका युजरने कॅप्शन दिलय की, “12 वी चे मार्क फक्त MBA प्रवेशासाठीच नाही, तर बंगळुरुत फ्लॅट मिळवण्यासाठी सुद्धा महत्वाचे आहेत” असं लिहिलय.