Video : लाखमोलाचा जीव धोक्यात घालून सोन्यासारखं पशूधन वाचवलं! आसाममधील महापुरात आयुष्य उद्ध्वस्त
नवी दिल्ली: आसामला मुसळधार पावसाचा (Assam torrential rains) मोठा तडाखा बसला आहे. कोपिली नदीच्या (Kopili River) पुरामुळे अनेक लोकांना बेघर होण्याची वेळ आहे. प्रचंड पावसामुळे आसाममधील अनेक गावातून पुराचे पाणी घुसले आहे. या मुसळधार पावसामुळे नागरिकांची अनेक घरं उद्धवस्त झाली आहेत. संततधार पावसामुळे आणि पुरामुळे अनेक गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम आसाममधील प्रशासन व्यवस्था […]
नवी दिल्ली: आसामला मुसळधार पावसाचा (Assam torrential rains) मोठा तडाखा बसला आहे. कोपिली नदीच्या (Kopili River) पुरामुळे अनेक लोकांना बेघर होण्याची वेळ आहे. प्रचंड पावसामुळे आसाममधील अनेक गावातून पुराचे पाणी घुसले आहे. या मुसळधार पावसामुळे नागरिकांची अनेक घरं उद्धवस्त झाली आहेत. संततधार पावसामुळे आणि पुरामुळे अनेक गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम आसाममधील प्रशासन व्यवस्था करत आहे.
A man tries to save his #livestock from the flood water of river Kopili in Kampur, #Nagaon.#Assam #AssamFlood pic.twitter.com/Lq4xLLVSLM
— G Plus (@guwahatiplus) June 17, 2022
एकीकडे महापुरामुळे लोकांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या पातळीवरून मदत पुरवली जात आहे. आपत्तीच्या या काळात ही परिस्थिती सुरू असतानाच आसाममधील कांपूर, नागाव (Kampur, Nagaon) येथील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन व्यक्ती आपल्या जनावरांना वाचवण्यासाठी पत्र्याच्या साहाय्याने त्याचा होडीसारखा वापर करून सहा बकऱ्यांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित स्थळी घेऊन जाण्यात येत आहे.
बकऱ्यांसाठी जीव धोक्यात
ज्या दोनव्यक्ती पुराच्या पाण्यातून बकऱ्यांना घेऊन जात आहेत, त्यांच्या छातीपेक्षा जास्त पाण्यातून आपल्या जनावरांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहेत. पाण्याची पातळी त्यांच्या छातीएवढी असूनही पाळीव प्राण्यांसाठी या दोन व्यक्ती त्या महापुराच्या त्या पाण्यातून धोका पत्करून पाण्यातून चालत जात आहेत. जनसामान्यां लोकांकडून आपला आणि आपल्यासोबत असणाऱ्या पाळीव प्राण्यांसाठी महापुराच्या पाण्यापासून वाचण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत.
धोका पत्करून पुराच्या पाण्यात उतरू नका
त्यामुळे आसाममधील आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, धोका पत्करून पुराच्या पाण्यात उतरू नका अथवा कोणत्याही साधनांचा वापर करुन पाण्यातून प्रवास करू नका असंही आवाहन करण्यात आले आहे.
आसाममधील 28 जिल्हे पूरबाधित
आसामधील 28 जिल्ह्यामधील 18.95 लाखांहून अधिक लोकांना या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. तर 55 हजार पेक्षा जास्त लोकांना थेट पुराच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
भूस्खलनामुळे आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू
हा व्हिडीओ व्हायरल होण्याआधी 24 लोकांना सुरक्षितस्थळी घेऊन घेऊन जात असतानाच एक बोट उलटल्यामुळे 3 लोकांना जीव गमवावा लागला होता. या बोटीतील 21 नागरिकांना वाचवण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. आसाम राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू झाला आहे.