Manipur violence : ‘कारगिल युद्ध लढलं, पण पत्नीला वाचवू नाही शकलो’; व्हायरल व्हिडीओतील महिलेचा आर्मी रिटायर पती हळहळला!
मणिपूरमधील व्हायरल व्हिडीओमध्ये माणसांमधील माणुसकी सोडाच एखाद्या नराधमासारखे व्हिडीओमधील पुरूष पीडित स्त्रियांसोबत वागताना दिसले. अशातच या प्रकरणातील मोठी माहिती समोर आली आहे.
मुंबई : देशभरात मणिपूरमधील दोन महिलांचा नग्न अवस्थेमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये माणसांमधील माणुसकी सोडाच नराधमासारखे व्हिडीओमधील पुरूष पीडित स्त्रियांसोबत वागताना दिसले. स्त्रिच्या शरीराला त्यांनी ज्या प्रकारे स्पर्श केला हे पाहून कोणालाही चीड येईल. मात्र आता सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. व्हायरल व्हिडीओमधील दोन पीडीतेंपैकी एका महिलेचा पती भारतीय सैन्यदलात होता. आसाम रेजिमेंटमध्ये ते सुभेदार पदावर होते मात्र त्यांच्या पत्नीसोबत जे काही घडलं त्याने ते पूर्णपणे कोलमडून गेले आहेत.
पीडित महिलेचा पती काय म्हणाला?
मी कारगिल युद्धामध्ये देशासाठी लढलो त्यासोबतच भारतीय शांती सेनेचा भाग म्हणून श्रीलंकेमध्ये होतो. कर्तव्य बजावत असाताना देशाचे रक्षण केलं पण मला माझ्या गावातील लोकांचं आणि माझ्या पत्नीचं संरक्षण करता आलं नाही. याचं मला वाईट वाटत असल्याचं भारतीय सैन्यामध्ये कर्तव्य बजावलेल्या पीडित महिलेचा पती म्हणाला.
4 मेला आमची घरं पेटवण्यात आलीत. त्यानंतर आमच्या समाजातील दोन महिलांना विवस्त्र करण्यात आले. त्यानंतर गावच्या रस्त्यावरून त्यांना चालवत नेलं. हा सर्व प्रकार घडत असताना पोलीस हजर होते मात्र त्यांनी कोणताही कारवाई केली नाही. या प्रकरणामधील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी पीडिते महिलेच्या पतीने केली.
4 मेला घडलेल्या या घटनेची तक्रार 18 मेला पोलिसांत दिली होती. पोलिसांनी 21 जूनला एफआयर नोंदवला. 4 मेला दुपारी 3 च्या सुमारास अज्ञात लोकांनी त्यांच्या गावावर हल्ला केला. हल्ला केलेली लोकं ही मैतेई समाजाचे होते, इतकंच नाहीतर हल्ला करत त्यांनी गावातील घरांना आग लावली आणि पैसे, दाग-दागिन्यांची लूट केली.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील आरोपींची ओळख होत असून त्यांना अटक करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणात आणखी 12 संशयितांना अटक करण्यासाठी मणिपूर पोलीस आणि 12 केंद्रीय संयुक्त पथकांची शोध मोहिम रावबली आहे. संतप्त जमावाने व्हिडीओमधील मुख्य आरोपी असलेल्या हुइरेम हेरदास याचं घर पेटवून दिलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.