मणिपूर पुन्हा धगधगतंय, आमदार-मंत्र्यांची घरं जाळली; बिरेन सिंह सरकारचा पाठिंबा काढला
Manipur Violence News : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. पुन्हा एकदा मणिपूरमध्ये जाळपोळीच्या घटना घडत आहेत. आमदार मंत्र्यांच्या घरावर जमाकडून हल्ले करण्यात येत आहेत. गाड्या जाळल्या जात आहेत. असं असताना बिरेन सिंह सरकारचा पाठिंबा काढण्यात आला आहे. वाचा सविस्तर...
भारताचा ईशान्येकडूील भाग पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटनांनी धगधगतो आहे. 15 नोव्हेंबरला मणिपूर – आसाम राज्यांच्या सीमेवर असमाऱ्या जिरी नदीत एक महिला आणि दोन मुलांचे मृतदेह सापडले. त्यानंतर मणिपूरमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. पुन्हा एकदा जाळपोळीच्या घटना घडू लागल्या. 16 नोव्हेंबरला संतप्त जमावाने इंफाळ भागातील आमदार आणि मंत्र्यांच्या घरावर हल्ला केला. तिथे असलेल्या गाड्यादेखील जाळण्यात आल्या. इंफाळ भागात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच जिथे हिंसाचारी शक्यता आहे. अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या जावयाच्या घरावर जमावाने हल्ला केला आहे. काही आमदारांच्या घरांवर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली आहे. मागच्या दीड वर्षांपासून सुकु असलेला हा हिंसाचार थांबवण्याचं नाव घेत नाहीये. मैतेई, कुकी आणि नागा आदिवासींमध्ये आधापासूनच वाद आहे. मैतेई गटाला जमातीचा दर्जा मिळवायचा आहे. तर नागा आणि कुकी त्यांना हा दर्जा मिळू नये म्हणून आंदोलन करत आहे.
बिरेन सिंह सरकारचा पाठिंबा काढला
मणिपूर राज्यामध्ये NPP (नॅशनल पीपल्स पार्टी) ने बिरेन सिंह सरकारचा पाठिंबा काढला आहे. मणिपूर विधानसभेत NPP पक्षाचे ७ आमदार आहेत. ६० आमदारांच्या मणिपूर विधानसभेचा बहुमताचा आकडा ३१ आहे. विधानसभेत भाजपचे ३२ आमदार आहेत. त्यामुळे सरकारला कुठलाही धोका नाही. मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यात मागच्या दीड वर्षांपासून सरकारला अपयश येत असल्याने NPP ने पाठिंबा काढला आहे. मागच्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. आता काही महिला आणि लहान मुलं यांचे मृतदेह सापडले होते. त्यामुळे पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे.
मणिपूरमध्ये सप्टेंबर महिन्यातही हिंसाचार झाला होता. आसामच्या सीमेजवळच्या जिरीबात जिल्ह्यात सात सप्टेंबरला हिंसाचार झाला. यात चार संशयित कट्टरपंथी आणि एका सामान्य व्यक्तीचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा मणिपूर धगधगतं आहे. अशातच नॅशनल पीपल्स पार्टीने बिरेन सिंह सरकारचा पाठिंबा काढला आहे.