“मणिपूरमधील हिंसाचार लोकशाही घातक”; ‘या’ संघटनेने केली चिंता व्यक्त…
मणिपूरमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर आता आरएसएसकडून शांततेचे आवाहन करण्यात आले असून मणिपूरमधील ही घटना लोकशाहीसाठी घातक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली : मणिपूरमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून हिंसाचार घडत असल्याने अनेकांचा त्यामध्ये बळी गेला आहे. या हिंसाचारात अनेकांना आपला जीव गमवावा लागला असल्याने आता शांततेचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही (आरएसएस) राज्यातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल तीव्र चिंताही व्यक्त केली जात आहे. याविषयी बोलताना आरएसएसकडून म्हटले आहे की, मणिपूरमध्ये गेल्या 45 दिवसांपासून सुरू असलेला हिंसाचार आता चिंताजनक पातळीवर जाऊन पोहचला आहे.
लाय हरोबा उत्सवावेळी जी निषेध रॅली निघाली त्यानंतर चुरचंदपूरमध्ये 3 मे रोजी या हिंसाचाराला सुरुवात झाली होती, मात्र हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचेही त्यांनी सांगितले.
विस्थापितांना पाठबळ
गेल्या कित्येक वर्षापासून परस्पर सौहार्द आणि सहकार्यपूर्ण जीवन जगणाऱ्यांमध्ये हिंसाचार घडल्याने सामाजिक परिस्थिती बिघडली आहे.त्यामुळे ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचेही आरएसएसने सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दुःखाच्या प्रसंगी विस्थापित आणि इतर पीडितांच्या पाठीशी उभा राहणार आहे.
लोकशाहीसाठी घातक
लोकशाही व्यवस्थेत हिंसाचाराला आणि द्वेषाला स्थान नसून आरएसएसच्या म्हणण्यानुसार हिंसाचार ही समस्या कोणत्याही समस्येचे निराकरण होऊ शकत नाही. तर परस्पर संवादातून आणि शांततापूर्णतेने व बंधुभावाच्या भावनेनतूनच ही समस्या मिठू शकते असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
आरएसएसकडून आवाहन
मणिपूरमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर आता आरएसएसकडून शांततेचे आवाहन करण्यात आले असून मणिपूरमधील ही घटना लोकशाहीसाठी घातक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता आरएसएसकडून स्थानिक प्रशासन, पोलिस, लष्कर आणि केंद्रीय संस्थांसह सरकारला आवाहन करण्यात आले आहे.
वेदनादायी हिंसाचार
ही घडणारी गंभीर आणि वेदनादायी हिंसाचाराच्या घटना त्वरित थांबवण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलावीतत, तसेच शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसेच विस्थापितांना मदत मिळावी यासाठी साहित्याचा अखंडित पुरवठा सुनिश्चित केला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.