शेवटपर्यंत गोव्याची सेवा करेन; नाकातल्या ट्यूबसह पर्रिकर म्हणाले How’s The Josh?
पणजी : प्रकृती बरी नसतानाही गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी गोव्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी ते खुर्चीवर बसलेले होते आणि त्यांच्या नाकात ट्यूबही होती. अखेरच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि समर्पित होऊन गोव्याच्या जनतेची सेवा करेन, असं आश्वासन त्यांनी दिलं. शिवाय मी पूर्ण शुद्धीत आहे आणि उत्साहही तेवढाच आहे, असंही ते म्हणाले. पर्रिकरांवर अमेरिकेत, मुंबईत, […]
पणजी : प्रकृती बरी नसतानाही गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी गोव्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी ते खुर्चीवर बसलेले होते आणि त्यांच्या नाकात ट्यूबही होती. अखेरच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि समर्पित होऊन गोव्याच्या जनतेची सेवा करेन, असं आश्वासन त्यांनी दिलं. शिवाय मी पूर्ण शुद्धीत आहे आणि उत्साहही तेवढाच आहे, असंही ते म्हणाले.
पर्रिकरांवर अमेरिकेत, मुंबईत, गोव्यात आणि नवी दिल्लीतही उपचार करण्यात आले. या उपचारांमुळेच ते सार्वजनिक ठिकाणी जास्त दिसून येत नाहीत. कायम लोकांमध्ये राहणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. केंद्रात संरक्षण मंत्री असतानाही जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते लोकांमध्ये मिसळून जायचे. पण आजारामुळे त्यांना सध्या जनतेपासून दूर रहावं लागत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी उरी सिनेमा पाहिला आणि How’s The Josh हा सिनेमातला डायलॉगही बोलून दाखवला होता.
राहुल गांधींकडून पर्रिकरांची विचारपूस, सभेत जाऊन राजकारण
राहुल गांधी यांनी गोव्यात जाऊन मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. पर्रिकर सध्या कॅन्सरने त्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरु असतानाही ते मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. राहुल गांधी यांनी ही खाजगी भेट असल्याचं सांगितलं आणि पर्रिकरांच्या प्राकृती स्वास्थ्यासाठी त्यांनी प्रार्थनाही केली. पण दुसऱ्याच दिवशी जाहीर सभेत या भेटीचं राजकारण करण्यात आल्याने पर्रिकर नाराज झाले आहेत.
राहुल गांधी भेटीनंतर काय म्हणाले?
राहुल गांधी दिल्लीत युवा काँग्रेसच्या कार्यक्रमात म्हणाले की, “मी काल तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना भेटलो. पर्रिकर यांनी स्वतः सांगितलं की राफेल डील बदलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला साधं विचारलंही नव्हतं”, असा खळबळजनक दावा राहुल गांधींनी केला. यानंतर पर्रिकरांनी हा दावा फेटाळत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.
पर्रिकरांकडून तीव्र नाराजी
कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय तुम्ही मला भेटलात आणि मी आपला सन्मान केला. पण ही माझी चूक होती का? आपल्या पाच मिनिटांच्या संवादात आपण राफेल व्यवहाराविषयी एक शब्दही बोललो नाहीत. कृपया या भेटीचा राजकीय फायद्यासाठी वापर करु नका, अशी विनंती पर्रिकरांनी पत्र लिहून केली आहे.
आपल्या भेटीनंतर तुम्ही काही दावे केल्याचं बातम्यांमधून समजलं. पण राफेल हा शब्दही आपल्या भेटीत निघाला नव्हता. मी एका जीवघेण्या आजाराशी लढत असताना गोव्याच्या जनतेची सेवा करतोय. सौजन्य दाखवण्यासाठी घेतलेल्या या भेटीचा तुम्ही जो राजकीय वापर केलाय, त्याने मला दुःख झालंय. कृपया यापुढे तुम्ही असं करणार नाही, याची अपेक्षा करतो, असंही पर्रिकरांनी पुढे म्हटलंय.