Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्येतून अनेक योजनांचा श्रीगणेशा! जालना-मुंबई वंदे भारतला पंतप्रधान दाखविणार हिरवी झेंडी

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू श्रीरामांच्या नगरीतून मराठवाड्यातील जनतेला नवीन वर्षांचे गिफ्ट देणार आहे. जालना-मुंबई वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान हिरवी झेंडी दाखवतील. अयोध्येतील एअरपोर्ट, अयोध्या धाम रेल्वे स्टेशन, अमृत भारत या योजनांचा पण आज श्रीगणेशा होत आहे.

अयोध्येतून अनेक योजनांचा श्रीगणेशा! जालना-मुंबई वंदे भारतला पंतप्रधान दाखविणार हिरवी झेंडी
jalna to csmt vandebharat express
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 9:25 AM

नवी दिल्ली | 30 डिसेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू श्रीरामाच्या नगरीतून मराठवाड्यातील जनतेला नवीन वर्षाची भेट देणार आहे. जालना-मुंबई वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान अयोध्येतून हिरवी झेंडी दाखवतील. आज पंतप्रधान मोदी अयोध्येत पोहचतील. अयोध्यावासियांवर अनेक सोयी-सुविधांचा पाऊस पडणार आहे. अयोध्यात रेल्वे स्टेशन, महर्षी वाल्मिक आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्धघाटन ते करतील. इतर अनेक विकास योजनांची घोषणा रामनगरीतून करण्यात येणार आहे. या योजनांमुळे अयोध्येला भविष्यात येणाऱ्या भाविकांना सोयी-सुविधा मिळतील. तर स्थानिकांना पण मोठा फायदा होणार आहे.

अमृत भारतसह वंदे भारतची भेट

पंतप्रधान मोदी शनिवारी अयोध्या नगरीतून देशभरातील नागरिकांसाठी दळणवळणाच्या जलद सुविधेचे उद्धघाटन करतील. 2 अमृत भारत आणि 6 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. अयोध्या-दरभंगा या दरम्यान एक अमृत भारत तर अयोध्या ते आनंद विवाह टर्मिनल या दरम्यान वंदे भारत ट्रेनची सुरुवात होणार आहे. देशभरातील रामभक्त, पर्यटकांना अयोध्येत अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. अत्याधुनिक अयोध्या धाम रेल्वे स्टेशन हे सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र असेल. या स्टेशनचे पहिल्या टप्प्यातील काम गतीने सुरु आहे. तीन टप्प्यात ते पूर्ण करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

जालना ते मुंबई वंदे भारत ट्रेन

जालना ते मुंबई वंदे भारत ट्रेनचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्धघाटन करतील. ते ऑनलाइन उपस्थिती असतील. तर देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे हिरवी झेंडी दाखवतील. ही वंदे भारत जालना येथून दररोज मुंबईसाठी धावेल. वंदे भारत ट्रेन सकाळी 5 वाजता जालना तर सकाळी 6 वाजता संभाजीनगरवरून सुटणार आहे. वंदे भारत 12 वाजता मुंबईत पोचणार आहे. मराठवाड्यातील अनेक प्रवाश्यांची यामुळे सोय होईल.

येथे ही धावणार वंदे भारत

जालना ते मुंबई वंदे भारत आजपासून सुरु होते. देशातील इतर पाच ठिकाणी पण वंदे भारत धावणार आहे. श्री माता वैष्णो देवी कटरा-नवी दिल्ली, अमृतसर-दिल्ली, कोईंबतूर-बंगळूरु, मंगलोर-मडगांव, अयोध्या-आनंद विहार टर्मिनल या दरम्यान वंदे भारत ट्रेन धावेल. येत्या काळात पण देशातील काही भागात ही वंदे भारत धावणार आहे. अनेक राज्यांनी वंदे भारतची मागणी रेटली आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.