Marathi in UP : उत्तर प्रदेशात मराठी भाषा ऐच्छिक करा, भाजप नेते कृपाशंकर सिंह यांची मागणी

भाजप नेते कृपा शंकर सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलंय.

Marathi in UP : उत्तर प्रदेशात मराठी भाषा ऐच्छिक करा, भाजप नेते कृपाशंकर सिंह यांची मागणी
भाजप नेते कृपाशंकर सिंह
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 11:14 AM

नवी दिल्ली : भाजप नेते कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक भाषा म्हणून मराठीचा (Marathi language) समावेश करण्याची विनंती केली आहे. या पत्रात पुढे म्हटलंय की , ‘यामुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात चांगल्या नोकऱ्या मिळण्यास मदत होऊ शकते.’ यामुळे आता उत्तर प्रदेशात मराठी भाषेला पर्यायी दर्जा मिळणार का, हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र, भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी यूपी सरकारला मराठीला पर्यायी भाषेचा दर्जा देण्याचं आवाहन केल्यानं त्यावर योगी सरकार काय निर्णय घेतं, हे पाहणं महत्वाच ठरेल. दरम्यान, मराठी भाषेसाठी नेहमी पुढाकार घेणाऱ्या मनसेनं मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

भाजप नेते कृपा शंकर सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून उत्तर प्रदेशातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी पर्यायी भाषा म्हणून मराठीचा समावेश करण्याची विनंती केली आहे. या पत्रात पुढे म्हटले आहे की, यामुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात चांगल्या नोकऱ्या मिळण्यास मदत होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

मराठी भाषेवर एक नजर

  1. महाराष्ट्र आणि गोव्याची अधिकृत राजभाषा
  2. जगात 10व्या क्रमांकावर आणि भारतात तिसऱ्या क्रमांकावर असलेली भाषा
  3. मराठी भाषेचे 2000 वर्षांचं अस्तित्व

सीएमओनं या सूचनेला तत्त्वतः सहमती दर्शवल्याची सूत्रांची माहिती आहे. CMO वाराणसी प्रदेशात पायलट प्रोजेक्ट म्हणून दत्तक घेण्याच्या विचारात आहे. या पत्रामुळे महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण होऊ शकतो. कारण मनसे महाराष्ट्रात उत्तर भारतीय, परराज्यातील लोकांसाठी सरकारी नोकरीच्या संधींना विरोध करत केला होता. तर दुसरीकडे शिवसेनेकडून देखील नोकरीत भूमिपुत्रांच्या प्राधान्यांबद्दल बोललं गेलं होतं.

कोण आहेत कृपाशंकर सिंह?

काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याला पाठिंबा देत त्यांनी 2019 मध्ये काँग्रेस सोडली. त्यानंतर 2021 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सिंह यांनी मुंबईतील अंडरवर्ल्डचा सुपडा साफ करण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. त्यांनी मराठी संस्कृती अंगीकारली आहे. ते अस्खलितपणे मराठी बोलतात आणि मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी चालीरीती अंगीकारली पाहिजे, असं ते मानतात. सिंग हे त्यांच्या उत्तम मराठी बोलण्यामुळे मराठी भाषिकांमध्येही खूप लोकप्रिय आहेत. मुंबईतील उत्तर भारतीयांचा तो एक परिचित चेहरा आहे. सिंग यांचा उत्तर भारतीय समाजात देखील मोठा दबदबा आहे. काँग्रेसने त्यांना पहिल्यांदा विधान परिषदेवर पाठवलंय. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. कलिना विधानसभा मतदारसंघातून ते तीन वेळा काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या ते जवळचे होते.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.