अजबच ! हनीमूनसाठी जाणारी नववधू ट्रेनमधून गायब, वॉशरूमला गेली ती परतलीच नाही, नवरा मात्र …
ट्रेनमधील वॉशरूममध्ये गेलेली एक महिला अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. ही नवविवाहीत महिला पतीसह हनीमूनसाठी जात होती.
पाटणा | 31 जुलै 2023 : पतीसह फिरायला जाणारी नवविवाहीत महिला (married woman missing) ट्रेनमधून अचानक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. वॉशरूममध्ये (washroom) गेलेली ही महिला बराच वेळ परत न आल्याने तिच्या पतीने शोधाशोध केली असता, ती गायब झाल्याचे समोर आले. किशनगंज स्टेशन येथे हा प्रकार घडला.
बिहारमधील मुजफ्फरपूर येथील हे जोडपं हनीमूनसाठी दार्जिलिंग येथे जात होते. ते दोघेही 12524 न्यू दिल्ली एनजेपी एक्सप्रेसमधून प्रवास करत होते. मात्र किशनगंज स्टेशन आल्यावर विवाहीत महिला वॉशरूममध्ये गेली आणि परत आलीच नाही. पत्नी बराच वेळ परत आली नाही यामुळे चिंतीत झालेल्या पतीने ट्रेनच्या सर्व बोगी तपासल्या, लोकांकडेही चौकशी केली. मात्र त्यानंतरही ती न सापडल्याने किशनगंज येथील रेल्वे स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली.
कुडाणी पोलीस स्टेशन हद्दीतील प्रिन्सचा विवाह 22 फेब्रुवारी रोजी मधुबनी जिल्ह्यातील काजल हिच्यासोबत झाला होता. लग्नानंतर पाच महिन्यांनी दोघे हनिमूनसाठी दार्जिलिंगला जाण्यास निघाले होते मात्र त्याचवेळी काजल ही ट्रेनमधून गायब झाली.
27 जुलैला रवाना, पण 28 ला झाली गायब
प्रिन्स कुमार हा विद्युत विभागात कार्यरत आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीत लग्न झाले, मात्र काही काम आणि कौटुंबिक जबाबदारी यांच्यामुळे तो व पत्नी लगेचच हनीमूनसाठी जाऊ शकले नाहीत. अखेर 27 जुलै रोजी ते दार्जिलिंग आणि सिक्कीमला हनिमूनसाठी जात होते. त्यासाठी दोघेही नवी दिल्ली एनजेपी एक्सप्रेस ट्रेनच्या एसी बी कोचमध्ये चढले.
किशनगंज येथून गायब झाली महिला
28 जुलै रोजी काजल ही वॉशरूममध्ये गेली. तेव्हा ट्रेन किशनगंज येथे थांबवी होती. थोड्या वेळाने ट्रेन सुटली, बऱ्याच वेळानंतरही पत्नी परत न आल्याने प्रिन्सने सर्व बोगीत जाऊन तिचा शोध घेतला, लोकांकडेही चौकशी केली, पण ती सापडली नाही. प्रिन्सने तिला फोन लावण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो बंद येत होता. अखेर त्याने घरच्यांना व सासरच्यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. पुढल्या स्टेशनवर उतरून तो किशनगंज येथे परत आला आणि पत्नी गायब झाल्याची तक्रार नोंदवली.
प्रिन्स कुमारच्या सांगण्यानुसार, त्याच्यात व पत्नीदरम्यान कोणताही वाद झाला नव्हता, सर्व काही आलबेल होते. लग्नाला लवकरच सहा महिने पूर्ण होणार होते. ना पत्नीशी काही भांडण झालं, ना तिचं इतर कोणावर प्रेम होतं. आपल्या पत्नीचे अपहरण करण्यात आले असावे, असा संशय व्यक्त करत तिचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी त्याने पोलिसांकडे केली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले असून ते पुढील असून तपास करत आहेत.