ट्रेनमधून गायब झालेली नववधू सापडली, चक्क ‘या’ शहरात मस्तपैकी करत होती शॉपिंग..

ट्रेनमधील वॉशरूममध्ये गेलेली एक महिला अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली होती. अखेर चार दिवसांनी ती सापडली आहे. पोलिसांनी तिला या शहरात...

ट्रेनमधून गायब झालेली नववधू सापडली, चक्क 'या' शहरात मस्तपैकी करत होती शॉपिंग..
Follow us
| Updated on: Aug 04, 2023 | 6:32 PM

गुड़गांव| 4 ऑगस्ट 2023 : लग्नाच्या सहा महिन्यानंतर हनीमूनला जातानाच विवाहीत महिला (married woman missing from train) ट्रेनमधून गायब झाल्याने एकच खळबळ माजली होती. किशनगंज स्थानकावर ट्रेन थांबलेली असताना ती गायब झाली होती. अखेर चार दिवसांनी ही महिला सापडल्याने (finally found) सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. ती गुड़गांव मधील एका मॉलमध्ये शॉपिंग करत होती. पोलिसांनी तिला शॉपिंग करतानाच ताब्यात घेतले. पण किशनगंज येथून ती गुड़गांव पर्यंत कशी पोहोचली, याबद्दल ती स्पष्ट उत्तरे देत नसल्याने तिच्याबद्दल पोलिसांचा संशय वाढला आहे.

नक्की काय झालं होतं ?

बिहारमधील मुजफ्फरपूर येथे राहणारं हे जोडपं हनीमूनसाठी दार्जिलिंग येथे जात होते. ते 12524 न्यू दिल्ली एनजेपी एक्सप्रेसमधून प्रवास करत होते. पण किशनगंज स्टेशन आल्यावर ती विवाहीत महिला वॉशरूमच्या बहाण्याने गेली ती परत आलीच नाही. बराच वेळ ती न आल्याने तिचा पती चिंतीत झाला आणि ट्रेनमधील सर्व बोगींमध्ये तिचा शोध घेऊ लागला, त्याने प्रवाशांकडेही चौकशी केली. मात्र त्यानंतरही ती न सापडल्याने त्याने अखेर किशनगंज येथील रेल्वे स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली.

हे सुद्धा वाचा

सहा महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

कुडाणी पोलीस स्टेशन हद्दीतील प्रिन्सचा विवाह 22 फेब्रुवारी रोजी मधुबनी जिल्ह्यातील काजल हिच्यासोबत झाला होता. लग्नानंतर पाच महिन्यांनी दोघे हनिमूनसाठी दार्जिलिंगला जाण्यास निघाले होते मात्र त्याचवेळी काजल ही ट्रेनमधून गायब झाली. प्रिन्स कुमार हा विद्युत विभागात कार्यरत आहे. त्याच्या सांगण्यानुसा, काजल व त्याचे फेब्रुवारीत लग्न झाले, मात्र काही कामामुळे ते लगेच हनीमूनसाठी जाऊ शकले नाहीत. अखेर जुलैअखेरीस ते दार्जिलिंग येथे जाण्यास निघाले. त्यासाठी दोघेही नवी दिल्ली एनजेपी एक्सप्रेस ट्रेनच्या एसी बी कोचमध्ये चढले. मात्र किशनगंज आल्यावर काजल गायब झाली ती परत आलीच नाही. प्रिन्सने पोलिसांत तक्रार नोंदवल्यावर त्यांनी कसून शोध घेण्यास सुरूवात केली.

गुड़गांव मध्ये करत होती शॉपिंग

अखेर पोलिसांना प्रिन्स याची पत्नी काजल ही गुड़गांवमध्ये शॉपिंग करताना सापडली. ती मॉलमध्ये सापडल्याची माहिती पोलिसांनी कळवल्याचे प्रिन्सने सांगितले आहे. मात्र ती किशनगंज येथून गुड़गांवपर्यंत कशी पोहोचली याबाबत काहीच स्पष्ट सांगत नसून उत्तर देण्यास टाळम् टाळ करत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.