आता रेल्वे क्रॉसिंगवर अपघात घडणार नाहीत; भारतीय रेल्वेकडून ‘या’ कामाला वेग

फाटक नसलेल्या क्रॉसिंगवर बस, ट्रक आणि इतर वाहने ट्रेनला धडकतात. ही बाब लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने मानवरहित क्रॉसिंग हटविण्याच्या कामाला गती दिली आहे.

आता रेल्वे क्रॉसिंगवर अपघात घडणार नाहीत; भारतीय रेल्वेकडून 'या' कामाला वेग
आता रेल्वे क्रॉसिंगवर अपघात घडणार नाहीतImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 11:33 PM

नवी दिल्ली : रेल्वे रुळांवर घडणार्‍या जीवघेण्या अपघातांवर लवकरच नियंत्रण येणार आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने रेल्वे क्रॉसिंग (Railway Crossing)वर होणारे अपघात (Accident) रोखण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर वारंवार अपघात होत आहेत. फाटक नसलेल्या क्रॉसिंगवर बस, ट्रक आणि इतर वाहने ट्रेनला धडकतात. ही बाब लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने मानवरहित क्रॉसिंग हटविण्याच्या कामाला गती दिली आहे. भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज नेटवर्कवरील सर्व मानवरहित क्रॉसिंग काढून टाकण्यात आले आहेत. क्रॉसिंग दूर करण्याचे काम मिशन मोड (Mission Mode)मध्ये केले जात आहे, असे रेल्वे मंत्रालयाने मंगळवारी सांगितले.

आयओबी / आरयुबीला प्राधान्य

मानवयुक्त क्रॉसिंगचे उच्चाटन जलद करण्याच्या उद्देशाने विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. यासाठी 100% निर्मूलन कार्यासाठी धोरणात बदल आणि रेल्वे ऑपरेशन्स सुधारणेसाठी ओव्हरब्रीज किंवा अंडर ब्रीज रोडला (ROB/RUB) प्राधान्यक्रम ठरवण्यात येत आहे.

निधीच्या रकमेत वाढ

ROB किंवा RUB च्या बांधकामाचा खर्च आतापर्यंत रेल्वे आणि संबंधित राज्य सरकार द्वारे समान केला जात आहे. निधीच्या नमुन्यातील अलीकडील बदलांमुळे दोन्ही पक्षांना त्यांच्या गरजेनुसार बांधकामाची परवानगी दिली गेली आहे. कामाला गती देण्यासाठी, मागील आर्थिक वर्ष 2021-22 मधील 4,500 कोटी रुपयांच्या तुलनेत (44 टक्के वाढ) रकमेचे वाटप 6,500 कोटी रुपये करण्यात आले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

क्रॉसिंगवर ओव्हरब्रीज किंवा अंडर ब्रीज रस्ते बांधणे

क्रॉसिंग हटविण्यासाठी त्या ठिकाणी ओव्हरब्रीज किंवा अंडरब्रीज पूल बांधले जात आहेत. 2014-22 या कालावधीत ROB/RUBs च्या बांधकामातील प्रगती 1,225 प्रतिवर्ष आहे, जी 2009-14 मधील वार्षिक 763 च्या तुलनेत 61 टक्के जास्त आहे.

चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, ऑगस्ट-2022 पर्यंत 250 ROB/RUB बांधण्यात आले आहेत, जे त्याच कालावधीसाठी 2021-22 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 5 टक्के अधिक आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.