राजधानी नवी दिल्लीत मुंडे भगिनी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक, पडद्यामागे काय घडतंय?

BJP National Convention : भाजपचे दिल्लीमध्ये दोन दिवस राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. राज्यातील भाजपचे दिग्गज नेते राजधानी नवी दिल्लीत उपस्थित आहेत. अशातच एक आतली बातमी समोर आली आहे. मुंडे भगिनी आणि फडणवीस यांच्यात बैठक पार पडली आहे.

राजधानी नवी दिल्लीत मुंडे भगिनी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक, पडद्यामागे काय घडतंय?
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 11:20 PM

नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन शनिवार (आज) आणि रविवारी नवी दिल्लीमध्ये सूरू आहे. या अधिवेशनाला देशभरातून कार्यकर्ते उपस्थित राहिले आहेत. महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेते दिल्लीमध्ये आहेत. अशातच  एक मोठी बातमी समोर आली असून खासदार प्रीतम  मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

खासदार प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वीस मिनिटे बैठक झाली. बैठकीचे कारण अस्पष्ट  आहे, केंद्रीय मंत्री रावसाहेव दानवे यांच्या बंगल्यामध्ये ही बैठक झाली. बैठकीनंतर प्रीतम मुंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्री भारती पवार, रावसाहेब दानवे, भागवत कराड, गिरीश महाजन, पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला.

राजकारणात माझ्यासोबत दगाफटका, माझा वनवास झाला. तुमचं प्रेम पाहण्यासाठीच हे सर्व झाल्याचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी सध्या ‘गाव चलो अभियान’ मध्ये केलं होतं. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जात आहे. आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत एकत्र आले आहेत. धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या गटात असल्याने पंकजा मुंडे येत्या विधानसभेमध्ये कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार? असा सवाल उपस्थित झाला आहे. यामध्ये सर्वात जास्त पंकजा मुंडे यांची गोची झाली आहे. त्यामुले नेमकी बैठक कशानिमित्त झाली यावर अद्याप प्रश्नचिन्हच आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.