ऑक्सिजन पुरवठ्यासाठी MEIL मैदानात, 11 क्रायोजेनिक टँकर्स तेलंगणा सरकारकडे सोपवणार
मेघा इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेडने (MEIL) थायलँडहून 11 टँकर्स आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी तीन क्रायोजेनिक टँकर्स भारतात दाखल होत आहेत. MEIL importing Oxygen Tankers

नवी दिल्ली: भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा दुसऱ्या लाटेला सामोरा जात आहे. दुसऱ्या लाटेमध्ये भारतासमोर प्रकर्षानं ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला. ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी भारत सरकार, राज्य सरकार, एनजीओ युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. ऑक्सिजन वाहतुकीसाठी लागणाऱ्या लागणाऱ्या क्रायोजनिक टँकरची कमी जाणवत असल्यानं त्याची आयात करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मेघा इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेडने (MEIL) थायलँडहून 11 टँकर्स आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी तीन क्रायोजेनिक टँकर्स भारतात दाखल होत आहेत. हे टँकर्स तेलंगणा सरकारकडे सोपवण्यात येणार आहेत. (Megha Engineering Corporation (MEIL) is importing eleven oxygen tankers from Thailand to India as part of its social service responsibility)
MEIL कडून 11 क्रायोजेनिक टँकर्सची आयात
भारतात ऑक्सिजन तुटवडा कमी व्हावा म्हणून युद्धपातळीवर काम सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून मेघा इंजिनिअरींग कॉर्पोरेशन लिमिटेड 11 क्रायोजेनिक टँकर्स तेलंगणा सरकारकडे सोपवणार आहे. प्रत्येक टॅंकरमधून 1.40 कोटी लिटर ऑक्सिजन वाहतूक केली जाऊ शकते.
सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून काम
मेघा इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे भारतातील व ऑक्सिजनचा तुटवड्यावर मात करण्यासाठी अकरा क्रायोजनिक टँकरची आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे क्रायोजनिक टँकर्स थायलँड येथून भारतात आणले जात आहेत. क्रायोजनिक टॅंकर्स भारतात आणून ऑक्सिजनचा तुटवडा कमी करावा या सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून मेघा इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड हे काम करत आहे.
पहिल्या टप्प्यात तीन ऑक्सिजन टँकर भारतात
मेघा इंजिनिअरींग कार्पोरेशन लिमिटेड भारतात 11 क्रायोजेनिक टँकर आयात करणार आहे. त्यापैकी पहिले तीन क्रायोजेनिक टँकर हे भारतातील हैदराबादच्या बेगमपेट विमानतळावर पोहोचत आहेत. इंडियन आर्मीच्या एअरक्राफ्टमधून क्रायोजेनिक टँकर्सची वाहतूक केली जात आहे. मेघा इंजिनिअरिंग लिमिटेड 11 क्रायोजेनिक टँकर्स भारत सरकारला मोफत देत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा कमी व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं मेघा इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे सांगण्यात आले.
Covaxin | कोव्हॅक्सिन लसी घेतलेल्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यावर निंर्बंध येणार?, जाणून घ्याhttps://t.co/gUcqZjTKwR#Covaxin | #Vaccine #InternationalTravel | #WHO
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 22, 2021
संबंधित बातम्या:
ऑक्सिजन पुरवठ्यासाठी MEIL मैदानात, ‘या’ राज्यांना मोफत ऑक्सिजन पुरवणार
(Megha Engineering Corporation (MEIL) is importing eleven oxygen tankers from Thailand to India as part of its social service responsibility)