Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंपनीचे सर्व कामं थांबवत ऑक्सिजन पुरवठ्याला प्राधान्य, MEIL कडून युद्धपातळीवर प्रयत्न, थायलंडमधून 11 टँकर्सची आयात

देशातील आघाडीची कंपनी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने ( Megha Engineering & Infrastructures Limited) रुग्णालयांमधील ऑक्सिजनची तुटवड्याचा प्रश्न सोडमवण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे.

कंपनीचे सर्व कामं थांबवत ऑक्सिजन पुरवठ्याला प्राधान्य, MEIL कडून युद्धपातळीवर प्रयत्न, थायलंडमधून 11 टँकर्सची आयात
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 3:24 AM

हैदराबाद : देशातील आघाडीची कंपनी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने ( Megha Engineering & Infrastructures Limited) रुग्णालयांमधील ऑक्सिजनची तुटवड्याचा प्रश्न सोडमवण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. यानुसार कंपनीने थेट वैद्यकीय वापरासाठीच्या लिक्विड ऑक्सिजनचा मोफत पुरवठा करण्यासाठी थायलंडमधून अद्ययावत ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकर मागवले आहेत (Cryogenic tanks from Bangkok Thailand). यामुळे तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा अशा 3 राज्यांमधील रुग्णालयांना वेगाने ऑक्सिजन पुरवठा करणं शक्य होणार आहे. देशातील ऑक्सिजनचा तुटवडा पाहता एमईआयएलने आपले इतर सर्व कामं थांबवत प्राधान्याने ऑक्सिजन प्रश्न सोडवण्यावर लक्ष केंद्रीत केलंय. त्यामुळे कंपनीचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. (MEIL importing 11 cryogenic tanks from Bangkok Thailand for transportation of medical liquid oxygen)

एमईआयएलच्या (MEIL) या महत्त्वकांक्षी योजनेतील 11 ऑक्सिजन टँकरपैकी पहिल्या टप्प्यात 3 टँक हवाई दलाच्या बेगमपेट स्थानकावर (Begumpet Air Force Station) पोहचले आहेत. उर्वरित 8 ऑक्सिजन टँकर पुढील काही दिवसात आणखी दोन टप्प्यात पोहचणार आहेत. आयात करण्यात येणाऱ्या प्रत्येक टँकरमध्ये जवळपास 1 कोटी 40 लाख लिटर वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करता येणार आहे. म्हणजेच एकूण 11 टँकर्समध्ये तब्बल 15 कोटी 40 लाख ऑक्सिजन रुग्णालयांना वेगाने पोहचवता येणार आहे (Supply of Liquid Medical Oxygen (LMO) to hospitals).

एमआयईएलचे (MEIL) वरिष्ठ अधिकारी, तेलंगणाचे अर्थमंत्री टी. हरीश राव, तेलंगणाचे मुख्य सचिव सोमेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सल्लागार समिती या सर्व मोहिमेवर लक्ष ठेऊन आहे. विशेष म्हणजे ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या या टँकरची आयात थायलंडमधील बँकॉकमधून करण्यासाठी देशाच्या संरक्षण मंत्रालयाने आणि परराष्ट्र मंत्रालयाने देखील परवानगी दिलीय. त्यामुळे संरक्षण दलाच्या विशेष विमानाने हे टँकर्स बँकॉकहून हैदराबादला आणले जात आहेत.

आता ऑक्सिजनची तीव्र गरज असणाऱ्या रुग्णांना उपलब्धता होणार : पी. राजेश रेड्डी

एमईआयएलचे उपाध्यक्ष पी. राजेश रेड्डी (P Rajesh Reddy, vice-president, MEIL) म्हणाले, “वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीपासून रुग्णालयांपर्यंत ऑक्सिजनची वाहतूक म्हणजे अनेक अडथळ्यांचं कोडं आहे. मात्र, आता या 11 क्रायोजेनिक टँकर्समुळे राज्य सरकारला तीव्र गरज असलेल्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात मदत होईल.”

“कंपनीची सर्व कामं थांबवत ऑक्सिजन पुरवठ्याला प्राधान्य”

विशेष म्हणजे एमईआयएलने कंपनीचे इतर सर्व कामं थांबवून ऑक्सिजन पुरवठ्याला प्राधान्य दिलंय. यासाठी त्यांच्याकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. एमईआयएलच्या बोलरूम येथील युनिटमधून 9 मे ते 21 मे 2021 या काळात 29,694 मेट्रिक टन (3 कोटी लिटर) वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशाला करण्यात आलाय. म्हणजे दररोज सरासरी 400 ऑक्सिजन सिलेंडर येथून पुरवले जात आहेत.

हेही वाचा :

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी MEIL मैदानात, ‘या’ राज्यांना मोफत ऑक्सिजन पुरवणार

MEIL ची स्वदेशी प्रगत तंत्रज्ञानावर आधारीत ऑइल ड्रिलिंग रिग्जची निर्मिती, 4 किलोमीटर खोल तेल विहीर काढण्याची क्षमता

व्हिडीओ पाहा :

MEIL importing 11 cryogenic tanks from Bangkok Thailand for transportation of medical liquid oxygen

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.