Underwater Metro : डोळ्याचं पारणं फिटणार! लवकरच पाण्याखाली धावेल मेट्रो, या राज्यात पहिला प्रयोग

Underwater Metro : भारतातही पाण्याखाली लवकरच मेट्रो धावणार आहे. या मेट्रो ट्रेनची लवकरच चाचणी होणार आहे. पाण्याखालून प्रवासाची पर्वणी लवकरच नागरिकांना मिळेल.

Underwater Metro : डोळ्याचं पारणं फिटणार! लवकरच पाण्याखाली धावेल मेट्रो, या राज्यात पहिला प्रयोग
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 8:17 PM

नवी दिल्ली : लंडन-पॅरिसच्या धरतीवर भारतातही पाण्याखालून मेट्रो रेल्वे (Underwater Metro) धावेल. देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचा श्रीगणेशा होईल. देश प्रगतीच्या वाटेवरच नाही तर पाण्याखालूनही धावणार असल्याचे हे चिन्ह आहे. विशेष म्हणजे यासाठी काही 10-20 वर्षे लागणार नाहीत. या अंडरवॉटर मेट्रोचा प्रयोग सुरु आहे. त्याची चाचणी सुरु आहे. ही चाचणी (Testing) संपल्यानंतर, त्याच्या यशस्वीनंतर ही पाण्याखालची मेट्रो सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्चून मालदीवला जाण्याची गरज उरणार नाही. पाण्याखालून प्रवासाची पर्वणी लवकरच नागरिकांना मिळेल.

कुठे होणार श्रीगणेशा देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रोचे काम सध्या हुबळी नदीमध्ये सुरु आहे. त्यासाठी एक सुरुंग तयार करण्यात येत आहे. ही मेट्रो ट्रेन या टनलमधून जाईल. यामध्ये 6 कोच असतील. यामधून अंडरवॉटर प्रवासाच अद्भूत नजारा प्रवाशांना याची देही याची डोळा अनुभवता येईल. इतर देशातील प्रगत तंत्रज्ञानाने भारावलेल्या भारतीयांना हा सूखद अनुभव देशातच घेता येईल.

चाचणीनंतर मेट्रो धावणार कोलकत्ता ईस्ट-वेस्ट मेट्रो प्रोजेक्ट अंतर्गत दोन 6 कोचची मेट्रो धावेल. त्यासाठीची चाचपणी आणि चाचणी सुरु आहे. या दोन्ही रेल्वेचे चाचणी हावडा समुद्रकिनारा आणि ट्रायल एस्प्लेनेड या दरम्यान करण्यात येत आहे. हे अंतर 4.8 किलोमीटरचे आहे.

हे सुद्धा वाचा

पहिली मेट्रोचा कोलकत्यातून श्रीगणेशा देशाची पहिली मेट्रो कोलकत्यातून धावली होती. मेट्रोची पहिली सुरुवात 1984 मध्ये कोलकत्ता येथे झाली होती. त्यानंतर दुसरी मेट्रो दिल्लीत 2002 मध्ये सुरु झाली होती. त्यानंतर इतर अनेक शहरात मेट्रोचे जाळे विणण्यात आले. महाराष्ट्रात मुंबईनंतर पुणे, नागपूर आणि इतर शहरात मेट्रो सेवा सुरु होणार आहे. आता देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रोचा श्रीगणेशा पण कोलकत्त्यातून होत आहे.

डिसेंबरपर्यंत काम होईल पूर्ण कोलकाता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (KMRC) या प्रकल्पाची जबाबदारी खाद्यावर घेतली आहे. अंडरवॉटर मेट्रोची सेवा या वर्षी डिसेंबरपर्यंत सुरु करण्याचा मानस आहे. हे काम आता प्रगतीपथावर आहे. लवकरच हे काम पूर्ण करण्यात येऊन, यावर्षाच्या अखेरीला पाण्याखालून प्रवासाचा आनंद लुटता येईल.

लंडन, पॅरिससारखी सेवा भारताची ही पहिली पाण्याखालील मेट्रो ट्रेन लंडन-पॅरिसच्या धरतीवर सुरु होत आहे. यामध्ये वर्ल्ड क्लास सेवा असेल. हा प्रकल्प पूर्ण होण्याअगोदरच याची तुलना लंडनमधील युरोस्टारशी करण्यात येत आहे. लंडन आणि पॅरिस अंडर वॉटर रेल्वे सेवा आहे. लाखो यात्री त्यातून प्रवास करतात.

120 कोटींचा खर्च या मेट्रोसाठी सुरुंग तयार करण्यासाठी जवळपास 120 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. एवढंच नाही तर सर्वात खोल रेल्वे स्टेशनचा मानही या प्रकल्पातील हावडा स्टेशनने पटकावला आहे. हौज खास नंतर, कोलकात्याचे हावडा स्टेशन कमाल 33 मीटर खोल असेल. सध्या हौज खास हे 29 मीटरपर्यंत सर्वात खोल मेट्रो स्थानक आहे.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.