‘मायक्रोसॉफ्टचा बाप भारतीय रेल्वे’, सर्व्हर डाऊन होऊनही रेल्वे एकदम सुरळीत, काय आहे कारण ?

मायक्रोसॉफ्ट आऊटेजमुळे जगभर गोंधळ उडाला. जगभरातील विमानतळ आणि विमान उड्डाणांचे वेळापत्रक ठप्प पडले. परंतू भारतीय रेल्वेवर याचाही जराही परिणाम झाला नाही. काय भारतीय रेल्वेचे सीक्रेट पाहा.....

'मायक्रोसॉफ्टचा बाप भारतीय रेल्वे', सर्व्हर डाऊन होऊनही रेल्वे एकदम सुरळीत, काय आहे कारण ?
Microsoft outageImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jul 22, 2024 | 9:49 PM

मायक्रोसॉफ्ट आऊटेजमुळे 19 जुलै रोजी जगाचे संगणक ठप्प झाले. जगातील एअर लाईन्स, टेलिकम्युनिकेशन, बँका व्यवहारांवर याचा थेट परिणाम झाला. जगातील बहुतेक सर्व विमानतळ आणि उड्डाणे तसेच रेल्वे अशा वाहतूक साधनांना देखील या सर्व्हर बिघाडाचा फटका बसला परंतू भारतीय रेल्वेवर याचा कोणताही परिणाम झाला नाही. मायक्रोसॉफ्ट 365 ऐप्समुळे हा गोंधळ उडाल्याचे नंतर मायक्रोसॉफ्ट कंपनीने स्पष्ट केले. मात्र भारतीय रेल्वेच्या गाड्या, तिकीट यंत्रणा, ट्रॅफीक यंत्रणेवर या आऊटेजचा काहीही परिणाम झालेला नसल्याचे रेल्वेने म्हटले आहे. अखेर रेल्वे यंत्रणेवर या जागतिक महा संकटाचा कोणताही परीणाम का झाला नाही ? याचे सीक्रेट रेल्वेने सांगितले आहे.

मायक्रोसॉफ्ट फेल्युअरमुळे जगभरातील संगणकाच्या स्क्रीन निळ्या झाल्या होत्या, त्यामुळे मुंबईतील 295 हून अधिक विमाने रद्द झाली. परंतू भारतीय रेल्वेला या संकटाची झळच पोहचली नाही. कारण भारतीय रेल्वेची आयटी विंग सेंटर फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ( आयआयटी )आणि ई-गर्व्हनन्स म्हणजेच क्रीस ही यंत्रणेच्या सॉफ्टवेअरचा वापर भारतीय रेल्वे करीत आहे. क्रीस ही रेल्वे मंत्रालयाच्या देखरेखी खाली काम करीत असते. रेल्वेच्या ट्रेन ऑपरेटिंग सिस्टीमचे डेव्हलपमेंट आणि मेन्टेनन्सचे काम क्रीस या संस्थेचे आहे. क्रीसच्या स्वतंत्र सॉफ्टवेअरवर रेल्वे कर्मचाऱ्यांना ट्रेनचे रियल टाईम इन्फॉर्मेशन मिळते. ट्रेनचे स्टेटस, ट्रॅक अक्युपन्सी, सिग्नलिंग करणे, ट्रेन तसेच मालगाड्यांना सुरळीत चालविणे ही काम क्रीस या यंत्रणेवर भरवसा ठेवून रेल्वे करीत असते. ‘क्रीस’ आपल्या  सॉफ्टवेअरमध्ये वेळोवेळी अपडेट  करीत असते. त्यामुळेच भारतीय रेल्वे मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर फेल होऊनही सुरळीत चालली. तर इंडिगो, स्पाईसजेट, आणि आकासा एअर लाईन्सचे बोर्डींग पास पासून सर्व कामे संगणकाऐवजी हाताने करावी लागली. त्यामुळे विमान उड्डाणांना प्रचंड विलंब लागल्याने जगभरात गोंधळ उडाला.

आयटी मंत्र्यांचे स्पष्टीकरण

आमचे मंत्रालय आयटी क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सेवेमधील जागतिक संकटाबाबत संपर्कात आहे. या घटनेमुळे देशातील एनआयसी नेटवर्कवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी दिली. या तांत्रिक बिघाडाचे कारण समजले असून आणि समस्येचे निराकरण करण्यासाठी पावले उचलली गेल्याचेही वैष्णव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’वर पोस्ट करीत सांगितले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.