Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Milk Rate : अमूल अन् मदर डेअरीच्या दूध दरात वाढ, शेतकऱ्यांना दिलासा

17 ऑगस्टपासून अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून दूध विकत घेतल्यानंतर त्यावर प्रक्रिया केल्यानंतर नव्या किमतीनुसार आता अमूल शक्ती दूध हे 50 रुपये लिटर, अमूल गोल्ड 62 रुपये प्रति लिटर आणि अमूल ताजा 56 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होणार आहे.

Milk Rate : अमूल अन् मदर डेअरीच्या दूध दरात वाढ, शेतकऱ्यांना दिलासा
देशातील दूध उत्पादनात घट
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 3:40 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून (Milk producer) दूध उत्पादकांना अच्छे दिन येत आहेत. तीन महिन्यांपूर्वीच (Milk Rate Hike) दुधाच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर आता पुन्हा (Amul Milk) अमूल आणि मदर दुध डेअरीच्या दरात वाढ झाली आहे. लिटरमागे 2 रुपयांनी दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला 3.5, 8.5 या फॅटसाठी लिटरमागे 37 रुपये मिळतील असा अंदाज आहे. उद्यापासून म्हणजेच 17 ऑगस्टपासून हे वाढीव दर लागू होणार आहेत. यासबंधी अमूल आणि मदर डेअरीने अधिकृतपणे सांगितले आहे. त्यामुळे त्याचा फायदा आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच होणार. मात्र, सर्वसामान्यांना महागाईचा सामना हा करावा लागणार हे वेगळेच.

मार्केटमध्ये अशा दराने मिळणार दूध

17 ऑगस्टपासून अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून दूध विकत घेतल्यानंतर त्यावर प्रक्रिया केल्यानंतर नव्या किमतीनुसार आता अमूल शक्ती दूध हे 50 रुपये लिटर, अमूल गोल्ड 62 रुपये प्रति लिटर आणि अमूल ताजा 56 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होणार आहे. फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, अहमदाबाद आणि गुजरातमधील सौराष्ट्र विभाग, दिल्ली एनसीआर, पश्चिम बंगाल, मुंबई इत्यादी ठिकाणी नवीन किंमती लागू होतील.

मदर डेअरीचाही निर्णय

अमूल सोबतच मदर डेअरीनेही दुधाचे दर वाढवले आहेत. मदर डेअरीने दिल्ली एनसीआरमध्ये बुधवारपासून प्रति लिटर 2 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या वाढीनंतर फुल क्रीम दुधाला 61 रुपये, टोन्ड दुधाला 51 रुपये प्रति लिटर आणि डबल टोन्डला 45 रुपये, तर गाईच्या दुधाला आता 53 रुपये प्रतिलिटर मोजावे लागणार आहेत. स्थानिक पातळीवर मात्र फॅटनुसार दर हे ठरवून दिले गेले आहेत.

पशूखाद्य अन् इंधन दरवाढीचा परिणाम

तीन महिन्यानंतर दुधाचे दर हे 2 रुपयांनी वाढले असले तरी पशूखाद्याचे दर हे महिन्यातून एकदा वाढतात. त्यामुळे दुग्धव्यवसया वाटतो तेवढा सोपा राहिलेला नाही. शिवाय वाहतूकीचा खर्च हा वाढत आहे. इंधनाचे दर वाढले की त्याचा परिणाम इतर बाबींवरही होतोच त्याचप्रमाणे दुधाचे दर वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी सामान्य माणसाला पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.