जास्त मुलं जन्माला घालण्यास तुम्ही पैसे देणार आहात का?; असदुद्दीन ओवैसींचा मोहन भागवतांना सवाल
Asaduddin Owaisi on RSS and Mohan Bhagwat : असदुद्दीन ओवैसी यांनी मोहन भागवत यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. मोहन भागवत यांनी मुलांना जन्माला घालण्यावरून केलेल्या विधानावर असदुद्दीन ओवैसी यांनी निशा साधला आहे. त्यांनी काही सवाल मोहन भागवत यांना केले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या वाढवण्याबाबतचं विधान केलं. प्रत्येक दाम्पत्याने तीन मुलं जन्माला घालावित, असं मोहन भागवत म्हणालेत. त्यांच्या या विधानावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरएसएसच्या मोहन भागवत यांनी सांगितलं की, कमीत कमी तीन मुलं जन्माला घाला, असं त्यांनी म्हटलं. मी त्यांना विचारतो की आपण कधी लग्न करणार आहात? स्वतः पंतप्रधान यांनी सांगितलं की ज्यांची मुलं जास्त, त्यांचे मंगळसूत्र काढून दुसऱ्याला घाला. त्यांनाही हे उत्तर आहे. मोहन भागवत म्हणतात की तीन मुलं जन्माला घाला. मुस्लिम लोकसंख्या खूप वाढवत आहेत असे ते म्हणतात, असं ओवैसी म्हणाले.
ओवैसींचा मोहन भागवतांना सवाल
मी मोहन भागवतांना विचारू इच्छितो की जास्त मुलं जन्माला घालणाऱ्यांना आपण काय देणार आहात? जे जास्त मुलं जन्माला घालतील त्यांच्या खात्यात 1 हजार 500 जमा करणार आहात का? ते मुलांना जन्माला घालण्याची योजना काढणार आहेत का? भागवत त्यांच्या जवळच्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी ही योजना आणली पाहिजे, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
कधीही मुस्लिम सामजाची लोकसंख्या जास्त होते. पण ते बदनामी करीत आहात. मुस्लिम समाजाच्या जन्मदरात सर्वात कमी आली आहे. आता आरआरएसला सांगावं लागत आहे की जास्त मुलं जन्माला घाला…. देशात उद्योग , व्यवसाय आणि तरुण रोजगार विषयी नाही. 30 वर्षांनंतर सर्वात जास्त म्हातारे राहतील, असं ओवैसी म्हणालेत.
मोहन भागवत यांचं लोकसंख्येबाबतचं विधान काय होतं?
लोकसंख्या कमी होत आहे हा चिंतेचा विषय आहे. लोकसंख्या शास्त्र सांगते की 2.1 पेक्षा खाली गेलो तर तो समाज नष्ट होतो. जगाच्या पाठीवर नसतो त्याला कोणी नष्ट करेल असं नाही. तर तो स्वतःहून नष्ट होतो. अनेक भाषा आणि समाज असेच नष्ट झाले आहे. आपल्या देशाची लोकसंख्या नीती 2000 च्या जवळपास ठरली. त्याच्यातही असे सांगितले आहे की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली राहू नये. आता पॉईंट एक तर माणूस जमत नाही. मग जर दोन पॉईंट एक एवढी वाढ पाहिजे. तर अपत्य दोन पेक्षा जास्त पाहिजेत. मग तीन अपत्य कमीत कमी असली पाहिजेत. असं शास्त्र सांगतो. ही संख्या यासाठी ही महत्त्वाची आहे कारण समाज टिकला पाहिजे, असं विधान मोहन भागवत यांनी केलं होतं.