What India Thinks Today: रोजगार मागणारे नव्हे, देणारे व्हा; ‘अग्निपथ’ आंदोलनावर अनुराग ठाकूरांच भाष्य

कोरोनाच्या कठिण परिस्थितीत भारताने जगाला मदतीची कवाड खुली केली. कान्स चित्रपट महोत्सवात भारताला 'कंट्री ऑफ ऑनर'च्या सन्मानानं गौरविण्यात आलं.

What India Thinks Today: रोजगार मागणारे नव्हे, देणारे व्हा; ‘अग्निपथ’ आंदोलनावर अनुराग ठाकूरांच भाष्य
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 8:12 PM

नवी दिल्लीः जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. पंतप्रधान मोंदीच्या (PM Modi) करिश्मामुळे जगभरात 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. कोरोनाच्या कठिण परिस्थितीत भारताने जगाला मदतीची कवाड खुली केली. कान्स चित्रपट महोत्सवात भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’च्या सन्मानानं गौरविण्यात आलं. भारताचं जागतिक पातळीवर स्थान दिवसागणिक वाढत असल्याचे मत केंद्रीय प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी व्यक्त केलं. टीव्ही 9 ने आयोजित केलेल्या ‘व्हॉट इंडिया थिंक टूडे’ (What India Think Today) या चर्चासत्रात मंत्री ठाकूर सहभागी झाले होते. यावेळी ठाकूर ऑलिम्पिक पासून कान्स चित्रपट महोत्सवावर भाष्य केलं. केंद्रानं उचललेल्या क्रीडा विषयक धोरणांमुळे टॉप-10 पदक विजेत्या राष्ट्रांच्या यादीत भारतीय खेळाडूंचा समावेश निश्चितच असेल असा विश्वास मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

अग्निपथ सर्वोत्तम संधी

अग्निपथ योजनेला मंत्री अनुराग ठाकूर यांनी समर्थन दिलं आहे. अग्नीवीर चार वर्षानंतर सेवेतून बाहेर पडल्यानंतर वेतनाचे 20-25 लाख व अतिरिक्त 11 लाख रुपये मिळतील. अग्नीवीरांपैकी 25% उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल व 75% उमेदवारांना खासगी क्षेत्रात सामावून घेतले जाईल असे सांगत मंत्री ठाकूर यांनी अग्निपथ योजनेला होत असलेल्या वाढत्या विरोधाबद्दल स्पष्टीकरण देताना मत व्यक्त केलंय.

रोजगार देणारे बना

बेरोजगारीच्या मुद्द्यावर मंत्री ठाकूर यांनी रोजगार मागणाऱ्यांपेक्षा रोजगार देणारे व्हा अशी भूमिका मांडली आहे. कोविड संकटात भारतीय अर्थव्यवस्थेची वेगानं प्रगती होत आहे. भारतात कृषी संबंधित खतांच्या स्थिर आहे. जगभरात किंमतीनी उच्चांक गाठला असताना सरकारनं किंमती स्थिर राखण्याचं आव्हान पेललं. शेतकऱ्यांवर अतिरिक्त भार निर्माण होऊ दिला नाही असे मत मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केलं.

ऑलिम्पिकमध्ये भारत झळकणार

केद्रानं क्रीडा धोरणाला बळकटी देण्यासाठी धोरणात्मक पावलं उचलली आहे. कोविड काळात प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीत भारतीय खेळाडूंनी पदकाची लयलूट केली. मोदी सरकार प्रशिक्षणापासून खेळाडूंच्या सर्व खर्चाचा भार उचलते. वर्ष 2032, वर्ष 2036 आॕलिम्पिक डोळ्यासमोर ठेऊन सरकारनं रणनीती आखली आहे.

100 बिलियन डॉलरची इंडस्ट्री

भारतीय सिनेमांच्या बदलत्या स्थितीवर मंत्री ठाकूर यांनी भाष्य केलंय. सिनेमाचा कंटेट मध्यवर्ती आहे. वर्ष 2030 मध्ये भारतीय सिनेमा उद्योगाची उलाढाल 100 बिलियन डॉलरवर पोहोचणार असल्याचं मत मंत्री ठाकूर यांनी व्यक्त केलं. आगामी काळात भारत कंटेटच हब बनणार आहे. ओटीटी प्लॕटफॉर्मवर वाढता प्रतिसाद मिळत आहे. मात्र, नियमनाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करीत मंत्री ठाकूर यांनी कायद्याकडे बोट दाखवलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.