Indian Railway : रेल्वे स्थानकांवरील सेवानिवृत्त खोल्या पुन्हा सुरु करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

रेल्वे मंत्रालयानं विभागीय रेल्वेला कोविड संबंधित प्रोटोकॉलसह स्थानिक स्थिती लक्षात घेऊन स्थानकांवरील सेवानिवृत्त खोल्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यास परवानगी दिली आहे.

Indian Railway : रेल्वे स्थानकांवरील सेवानिवृत्त खोल्या पुन्हा सुरु करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 12:09 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयानं अजून एक निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयानं विभागीय रेल्वेला कोविड संबंधित प्रोटोकॉलसह स्थानिक स्थिती लक्षात घेऊन स्थानकांवरील सेवानिवृत्त खोल्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, रेल्वे बोर्डाने यापूर्वीच सेवानिवृत्त खोल्या, रेल्वे यात्री निवास आणि IRCTC द्वारे चालवले जाणारे हॉटेल्स पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे.(Ministry of Railway permission to reopening of retiring rooms at Stations)

सध्यस्थितीत आवश्यकतेनुसार आणि टप्प्याटप्प्याने विविध विशेष एक्सप्रेस / प्रवासी गाड्यांची सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीचा विचार करुन रेल्वेनं सरकारने घालून दिलेल्या नियमावलीच्या पूर्ततेनुसार स्थानकांवर सेवानिवृत्त खोल्या सुरु करण्याचं ठरवलं आहे. कोरोनाचा प्रवास रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून ही सेवा बंद करण्यात आली होती. पण आता पुन्हा ती सुरु करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. तसा आदेश रेल्वे मंत्रालयानं विभागीय रेल्वेला दिला आहे.

प्लॅटफॉर्म तिकीट 5 पटीनं वाढवलं!

मध्य रेल्वेनं प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आता मुंबई मेट्रोपोलिटन रिजन म्हणजे MMR रिजनमधील प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट तब्बल 5 पट वाढवलं आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता उन्हाळ्यात गर्दी रोखण्यासाठी मध्य रेल्वेनं हे पाऊल उचललं आहे. मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट आता 10 रुपयांवरुन 50 रुपये केली आहे.

यापूर्वी मार्च 2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकीट वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मध्य रेल्वेनं मुंबई, पुणे, भुसावळ, आणि सोलापूर डिव्हिजनमध्ये प्लॅटफॉर्म तिकीत 10 रुपयांवरुन 50 रुपये केलं होतं.

नवे दर 15 जूनपर्यंत लागू राहतील

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्यात रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर 50 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेचा हा निर्णय गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घेण्यात आला आहे. रेल्वेने निश्चित केलेले नवे दर 24 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहेत. हे दर 15 जूनपर्यंत लागू असणार आहेत. उन्हाळ्यात अनेक लोक सुट्ट्यांसाठी जात असतात. तसंच यात्रांसाठी जाणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर वाढवण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

भारतीय रेल्वेची खास ‘लाईफलाईन एक्सप्रेस’, प्रत्येक भारतीयाचा अभिमान!

पुढच्या 5 दिवसांत रेल्वे प्रवाशांसाठी Good News, तिकिटांबाबत मोठी घोषणा

Ministry of Railway permission to reopening of retiring rooms at Stations

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.