Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधानांचे बालमन गेले हरकून, शाळेच्या बाकड्यावर पुन्हा आठवले दिवस..आता करणार शाळांचा कायापालट

मिशन स्कूल ऑफ एक्सलन्सच्या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी स्वतः मुलांसोबत वर्गात बसलेले दिसून आले. यावेळी त्यांनी नवीन स्कूल ऑफ एक्सलन्सचे वेगळेपणही जाणून घेतले.

पंतप्रधानांचे बालमन गेले हरकून, शाळेच्या बाकड्यावर पुन्हा आठवले दिवस..आता करणार शाळांचा कायापालट
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 3:47 PM

गांधीनगरः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत, राजधानी गांधीनगरमध्ये पंतप्रधान मोदींनी मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात आले आहे. अडालज, गांधीनगर येथे एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी मिशन स्कूल ऑफ एक्सलन्ससाठी (Mission School of Excellence) 10,000 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गुजरातमधील सर्व शिक्षकांचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे मिशन स्कूल ऑफ एक्सलन्सनिमित्त अभिनंदनही केले. या कार्यक्रमात त्यांनी सर्व लोकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याचेही आवाहनही करण्यात आले आहे.

मिशन स्कूल ऑफ एक्सलन्सच्या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी स्वतः मुलांसोबत वर्गात बसलेले दिसून आले. यावेळी त्यांनी नवीन स्कूल ऑफ एक्सलन्सचे वेगळेपणही जाणून घेतले.

यावेळी बोलताना त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची माहितीही दिली. शिक्षण क्षेत्रातील बदलामुळे मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स एनईपी 2020 अंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठा बदल होणार असल्याच विश्वास त्यांनी दाखवून दिला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी सांगितले की, स्कूल ऑफ एक्सलन्समध्ये सर्व भारतीय भाषा विज्ञान, तंत्रज्ञान आणि औषधाविषयांचा अभ्यास केला जाणार आहे.

यामध्ये विद्यार्थ्यांना स्मार्ट क्लासेसद्वारे नव्या पद्धतीने अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांसाठीही प्रशिक्षण केंद्रही सुरू करण्यात येणार आहेत. तसेच शाळेत स्मार्ट कॉम्प्युटर लॅबही करण्यात येणार आहे.

गुजरातमधील अडालज येथील त्रिमंदिर येथील मिशन स्कूल ऑफ एक्सलन्सच्या शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी ते म्हणाले की, आज 5G स्मार्ट सुविधा स्मार्ट अध्यापनासह शिक्षण प्रणालीला पुढील स्तरावर घेऊन जाणार आहे.

त्याचवेळी, राज्याचे शिक्षणमंत्री जितू वाघानी हे म्हणाले की, गुजरातमध्ये पुढील चार वर्षांत 50,000 शाळेचे वर्, 1.5 लाख स्मार्ट क्लासरूम, 5,000 अटल टिकरिंग लॅब आणि 20,000 संगणक प्रयोगशाळा उभारण्यात केल्या जाणार आहेत.

कुंपणानेच शेत खाल्ले, दहावी मराठीचा पेपर केंद्र संचालकानेच फोडला?
कुंपणानेच शेत खाल्ले, दहावी मराठीचा पेपर केंद्र संचालकानेच फोडला?.
तारकर्ली बिचवर मोठी दुर्घटना, 5 पर्यटक बुडाले, दोघांचा मृत्यू
तारकर्ली बिचवर मोठी दुर्घटना, 5 पर्यटक बुडाले, दोघांचा मृत्यू.
'मोदींना पवार यांच्या बाजूला कसे..., ' काय म्हणाले संजय राऊत
'मोदींना पवार यांच्या बाजूला कसे..., ' काय म्हणाले संजय राऊत.
तुळजा भवानी मातेच्या मूर्तीची जागा हलविणार ? काय आहेत घडामोडी
तुळजा भवानी मातेच्या मूर्तीची जागा हलविणार ? काय आहेत घडामोडी.
धनंजय मुंडेंना कोण वाचवतंय? अंजली दमानिया यांचा थेट आरोप काय?
धनंजय मुंडेंना कोण वाचवतंय? अंजली दमानिया यांचा थेट आरोप काय?.
राज ठाकरे-उदय सामंतांच्या भेटीने भुवया उंचावल्या, मनसे नेते म्हणाले..
राज ठाकरे-उदय सामंतांच्या भेटीने भुवया उंचावल्या, मनसे नेते म्हणाले...
पुलाचं काम करून थकलेल्या मजुरांवर झोपेतच काळाचा घाला, 5 ठार
पुलाचं काम करून थकलेल्या मजुरांवर झोपेतच काळाचा घाला, 5 ठार.
सुरेश धस मस्साजोगमध्ये, देशमुख कुटुंबियंची भेट घेतल्यानंतर म्हणाले...
सुरेश धस मस्साजोगमध्ये, देशमुख कुटुंबियंची भेट घेतल्यानंतर म्हणाले....
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले "मी बोलण्याचा
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले