ममतांच्या माजी खासदाराला भाजप विधानसभेच्या रिंगणात उतरवणार?

मोहन भागवत यांच्या माध्यमातून भाजप मिथुन चक्रवर्तींना आपल्याकडे खेचण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Mithun Chakraborty West Bengal Vidhansabha)

ममतांच्या माजी खासदाराला भाजप विधानसभेच्या रिंगणात उतरवणार?
ममता बॅनर्जी, मिथुन चक्रवर्ती, अमित शाह
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 2:10 PM

मुंबई : सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी प्रख्यात अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदारपद भूषवलेल्या चक्रवर्तींना भाजप भागवतांच्या माध्यमातून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. (Mithun Chakraborty might be West Bengal Vidhansabha BJP Candidate)

सरसंघचालक मोहन भागवत आज सकाळी अंदाजे सव्वानऊ वाजता मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले होते. भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यात दीड तासापेक्षा जास्त काळ चर्चा रंगली होती. ही भेट कौटुंबिक स्वरुपाची असल्याचा दावा चक्रवर्तींनी केला, परंतु आगामी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीय महत्त्व आहे.

“राजकीय नव्हे, कौटुंबिक भेट”

मोहन भागवतांसोबत झालेली भेट कौटुंबिक होती. खूप दिवसापासून आम्हाला भेटायचं होतं. पण आमच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे वेळ मिळत नव्हता, असं चक्रवर्तींनी सांगितलं. मोहन भागवत यांनी आज घरी येऊन नाश्ता केला. नागपूरला त्यांनी मला सहकुटुंब बोलवलं आहे, असंही मिथुन चक्रवर्तींनी सांगितलं.

चक्रवर्ती-भागवत यांची आधीही भेट

मिथुन चक्रवर्ती आणि मोहन भागवत यांची ही पहिलीच भेट नाही. ऑक्टोबर 2019 मध्येही दोघांची भेट झाली होती. नागपुरातील संघ कार्यालयात त्यावेळी दोघे भेटले होते.

मिथुन चक्रवर्ती तृणमूलचे माजी खासदार

पश्चिम बंगाल निवडणुका तोंडावर असल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. मिथुन चक्रवर्ती हे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार होते. मात्र वारंवार गैरहजेरीच्या कारणास्तव त्यांनी स्वतःहून खासदारकीचा राजीनामा दिला होता. (Mithun Chakraborty might be West Bengal Vidhansabha BJP Candidate)

भाजपचा चक्रवर्तींवर डोळा?

पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये भाजप मिथुन चक्रवर्तींना विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिथुन यांची भेट घेऊन मोहन भागवत यांच्या माध्यमातून भाजप चक्रवर्तींना आपल्याकडे खेचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या :

मिथुन चक्रवर्तीला त्यांची मुलं ‘पप्पा’ म्हणत नाहीत, कारण…

मोहन भागवत अभिनेते मिथुन चक्रवर्तींच्या घरी

(Mithun Chakraborty might be West Bengal Vidhansabha BJP Candidate)

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.