राज्यातील युवकांची स्वप्नं चुरगळून गुजरातच्या युवकांना स्वप्नं दाखवली, राष्ट्रवादीच्या नेत्याने निशाणा साधला
गुजरात निकालाविषयी आपलं मत व्यक्त करताना ते म्हणाले की, गुजरातचा निकाल म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 31 व गृहमंत्र्यांच्या 38 सभा घेण्यात आल्या होत्या.
मुंबईः गुजरातमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांच्या समर्थकांसह विरोधकांकडून भाजपचे अभिनंदन केले जात आहे. त्यामुळे आता राज्यातील विरोधी गटाकडूनही नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे अभिनंदन करण्यात येत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी अभिनंदनाचे ट्विट करत त्यांना जोरदार टोला लगावला आहे.
महाराष्ट्रात येणारे प्रकल्प गुजरातमध्ये गेले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपर निशाणा साधला. यावेळी त्यांनी रोजगाराचा प्रश्न उपस्थित करून गुजरात सरकारचे अभिनंदन करत त्यांना टोला लगावला आहे.
महाराष्ट्राच्या युवांच्या नोकरीच्या स्वप्नांना चुरगळून तेच स्वप्न गुजरातच्या युवांना दाखवत स्वतःचं सत्तेचं स्वप्न साकारणाऱ्या भाजपाचं ‘हार्दिक’ अभिनंदन तर हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला नमवत विजयी झालेल्या काँग्रेस आणि आपचंही मनःपूर्वक अभिनंदन! pic.twitter.com/bDfWW0uSts
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 8, 2022
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हणाले की, महाराष्ट्राच्या युवांच्या नोकरीच्या स्वप्नांना चुरगळून तेच स्वप्न गुजरातच्या युवांना दाखवत स्वतःचं सत्तेचं स्वप्न साकारणाऱ्या भाजपाचं ‘हार्दिक’ अभिनंदन म्हटले आहे.
कारण महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये गेले असल्याने येथील युवकांचा रोजगार गेला आहे. त्याविषयावरूनच त्यांनी गुजरातच्या भाजपवर टीका केली आहे.
येथील युवकांची स्वप्नं हिसकावून घेऊन तिच स्वप्न गुजरातमधील युवकांना दाखवण्याचं कारस्थान भाजपने केले आहे. त्यामुळे त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा पराभव करणाऱ्या काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचंही त्यांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी गुजरात निकालाविषयी आपलं मत व्यक्त करताना ते म्हणाले की, गुजरातचा निकाल म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 31 व गृहमंत्र्यांच्या 38 सभा घेण्यात आल्या होत्या.
गुजरातमध्ये भाजपला मिळालेला हा विजय सहजासहजा मिळाला नाही तर अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या डझनभर सभा गुजरातमध्ये झाल्या होत्या.
तर अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही गुजरातमध्ये तळ ठोकून प्रचार केला होता त्याचच हे फलित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आमदार रोहित पवार यांनी गुजरात निवडणुकीविषयी अभिनंदन केले असले तरी भाजपची त्यांनी निवडणुकीतील गणितं मांडली आहेत.