Mamata Banerjee on Journalist : ममता बॅनर्जींची मोठी घोषणा, सर्व पत्रकारांना कोविड योद्ध्यांचा दर्जा

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केलीय.

Mamata Banerjee on Journalist : ममता बॅनर्जींची मोठी घोषणा, सर्व पत्रकारांना कोविड योद्ध्यांचा दर्जा
mamata banerjee
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 4:31 PM

कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केलीय. त्यांनी राज्यातील सर्व पत्रकारांना कोविड योद्ध्याचा दर्जा देण्याची घोषणा केलीय. त्यामुळे सरकारच्या अनेक योजना आणि सोयी सुविधांचा पत्रकारांना लाभ घेता येणार आहे. त्या कोलकातामध्ये बोलत होत्या (Mmata Banerjee declare all journalists as COVID warriors).

“नंदीग्राममधील निवडणूक अधिकाऱ्याच्या जीवाला धोका”

ममत बॅनर्जी म्हणाल्या, “नंदीग्राममधील निवडणूक अधिकाऱ्याने पुन्हा मतमोजणीला परवानगी दिली तर माझ्या जीवाला धोका असल्याचं पत्र लिहिल्याची माहिती मला मिळाली आहे. तब्बल 4 तास मतमोजणी केंद्रावर सर्व्हर डाऊन होतं. राज्यपालांनीही माझं अभिनंदन केलं होतं. मात्र, अचानक सर्व काही बदललं.”

“भाजप आणि केंद्रीय यंत्रणेने आपल्यावर खूप अत्याचार केला असला तरी शांतता बाळगा”

“प्रत्येकाने राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावी आणि कोणत्याही हिंसक घटनेत सहभागी होऊ नये. आपल्याला माहिती आहे की भाजप आणि केंद्रीय यंत्रणेने आपल्यावर खूप अत्याचार केले आहेत. मात्र, आपल्याला शांतता ठेवायची आहे. सध्या आपल्याला कोविड 19 विरोधात लढायचं आहे,” असंही ममता बॅनर्जी यांनी नमूद केलं.

“देशभरातील कोरोना लसीकरणासाठी केंद्राने 30,000 कोटी रुपयांना मंजूरी द्यावी”

यावेळी ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडे लसीकरणाबाबत महत्त्वाची मागणी केलीय. ममता बॅनर्जी म्हणाल्या, “केंद्र सरकारने देशभरात प्रत्येकाचा समावेश असेल अशा व्यापक लसीकरणासाठी 30,000 कोटी रुपये मंजूर करावेत अशी आम्ही विनंती करतो.”

“सर्व लसी आणि ऑक्सिजन केवळ 2-3 राज्यांमध्ये पाठवत आहेत”

“मला मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार सध्या सर्व लसी आणि ऑक्सिजन केवळ 2-3 राज्यांमध्ये पाठवत आहे,” असाही आरोप ममता बॅनर्जी यांनी केलाय.

ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. त्या सध्या कोलकात्यात आहेत.

हेही वाचा :

West Bengal Result : पश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेस स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शुन्यावर!

तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे सीबीआय, ईडी नाही; भुजबळांचा चंद्रकांतदादांवर पलटवार

आसाम-पुद्दुचेरीत बहुमत, केरळातही भोपळाही फोडला नाही, भाजपची विधानसभा निवडणुकीत स्थिती काय?

व्हिडीओ पाहा :

Mmata Banerjee declare all journalists as COVID warriors

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.