बाईकवर बसणार इतक्यात खिशातल्या मोबाईलचा ब्लास्ट, चार जण जखमी, कुठे घडली घटना
Mobile Blast : मोबाईल वापरताना सावधान व्हावे अशी घटना घडली आहे. एक तरुण बाईकवर बसत असतानाच त्यांच्या पॅण्टमधील मोबाईलमधून धूर येऊन त्याचा स्फोट झाल्याने या तरुणासह चार जण जखमी झाले आहेत.
Mobile Blast : मोबाईलचा वापर हल्ली प्रचंड प्रमाणात वाढला आहे. एक क्षणही लोक मोबाईलला आपल्या पासून दूर ठेवायला तयार नाहीत. झोपेतही आपल्या शेजारी मोबाईल घेऊन लोक झोपत आहेत. अशा प्रकाराने धोके वाढत आहेत. मोबाईलच्या संदर्भात दर काही दिवसांनी मोबाईलमध्ये स्फोट झाल्याने तरुण जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत. आता आणखी एक मोबाईलच्या स्फोटाची घटना घडली आहे. या घटनेत चार लोक जखमी झालेले आहेत. त्यामुळे या घटनेची तीव्रता ध्यानात येते…
बिहारमधील सुपौल जिल्ह्यातल मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक तरुण मोबाईल खिशात ठेवून जात असताना अचानक मोबाईलमधून धुर येऊ लागला आणि काही समजायच्या आतच या मोबाईलचा स्फोट झाला. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. तर या तरुणाचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. या घटनेची खूप चर्चा होत आहे. या घटना बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील छातापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीपूर खुंटी वार्ड तीन येथे घडली आहे.
छातापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे विजय मंडल आपल्या घरातून भावाला डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी बाईकवर बसणार इतक्यात त्यांच्या पॅण्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईल मधून धूर येऊ लागला. हे पाहून विजय याचा भाऊ आणि आई-वडील त्याची मदत करण्यासाठी धावले. मोबाईल काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. परंतू तोपर्यंत मोबाईलचा स्फोट झाला. जोरदार धमाक्यानंतर विजयच्या पॅण्टला आग लागली. त्याला मोठ्या प्रमाणात भाजल्याच्या जखमा देखील झाल्या आहेत. विजयच्या मदतीसाठी धावलेल्या आई-वडील आणि भावाचे हात भाजल्याने ते देखील जखमी झाले आहे.
जखमींना रुग्णालयात दाखल केले
विजय आणि त्यांच्या घरातील सर्व जखमींना लागलीच छातापूर सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेनंतर कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. या मोबाईल पाच वर्षांपूर्वी खरेदी केला होता असे विजयने म्हटले आहे.