तो चहा प्यायला आला होता ! अचानक खिशात झाला मोबाईलचा स्फोट अन् लागली आग
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही मोबाईल फोन खिशात ठेवण्यापूर्वी दहा वेळा विचार कराल.
Viral video : आजकाल आपण मोबाईलशिवाय एक क्षणही घालवू शकत नाही. ऑफिसचं काम असो किंवा नातेवाईकांशी गप्पा मारणं असो, दिवसभर सगळेच फोनवर असतात असे दिसते. त्यामुळे अनेक कामेही सोपी झाली आहेत. दिवसभर फोन-मेसेज येत राहतात, यासाठी लोक नेहमी मोबाईल सोबत ठेवतात. तो बंद होऊ नये म्हणून जिथे संधी मिळेल तिथे तो चार्जिंगला लावला जातो. बरेच जण तो कधीही स्विच ऑफ करण्याताही विचार करत नाहीत. पण सतत मोबाईला वापरल्याचा परिणाम भयंकर होऊ शकतो. विश्वास बसत नसेल तर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पहा.
ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यात एक व्यक्ती चहाच्या दुकानात येताना दिसते. दुकानदाराने त्याला मातीच्या भांड्यात चहा दिला. ती व्यक्ती तो चहा पिणार असतानाच अचानक त्याच्या शर्टाच्या वरच्या खिशात ठेवलेला मोबाईल फुटला. आवाज इतका मोठा झाला की ही व्यक्ती उडी मारून उभी राहिली. त्याने खिशातून मोबाईल फेकण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत आग लागली होती. त्याचे कपडे जळत होते. तो आरडाओरड करू लागला. अखेर तो मोबाईल त्याने जमिनीवर टाकला. हे दृश्य पाहून दुकानदारही घाबरला. त्यांने धावत जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.
यह वीडियो तिरुवनंतपुरम का बताया जा रहा है। जहाँ इस वीडियो को देखने के बाद आप भी अपना मोबाइल जेब में रखने से पहले दस बार सोचेंगे। वीडियो में आप देख सकते हैं कि एक शख्स चाय की दुकान पर बैठा है. जब वह बहुत आराम से बैठा है, अचानक उसकी जेब में रखा सेल फोन फट गया। इसके बाद मोबाइल में… pic.twitter.com/1RSDjwnD0n
— ℝ?? ???? (@Rajmajiofficial) May 19, 2023
व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले
@Rajmajiofficial या अकाउंटवरून ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यांनी लिहिले, हा व्हिडिओ तिरुअनंतपुरमचा आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही मोबाईल खिशात ठेवण्यापूर्वी दहा वेळा विचार कराल. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक अवाक झाले आहेत. अनेकांना जाणून घ्यायचे आहे की हा कोणत्या कंपनीचा मोबाईल होता? मात्र, याबाबत काहीही माहिती नाही
फोन का फुटतात ?
निष्काळजीपणा आणि ओव्हर चार्जिंग केल्याने ही घटना घडल्याचे मानले जात आहे. तज्ञांच्या मते, अधिकाधिक लोक स्मार्टफोन वापरत आहेत आणि लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे ते फोन रात्रभर चार्जिंग ठेवतात. यामुळे, फोन जास्त गरम होतो आणि बॅटरी देखील गरम होते. काही लोक स्थानिक चार्जर वापरतात किंवा बाहेर जाऊन चार्जिंग बूथवर फोन चार्ज करतात. पण कंपनीकडून मिळालेला चार्जरच वापरावा.