पाटना : सध्याच्या राजकारणात सेवाभाव कमी झाला आहे. राजकारण सेवेसाठी कमी पदासाठी जास्त केलं जातं. पद मिळवल्यानंतर ते टिकवून ठेवण्यासाठी राजकारणी वेगवेगळ्या कृल्पत्या लढवत असतात. पदाला न्याय देण्यापेक्षा त्याचा फायदा घेण्याकडे जास्त कल असतो. सध्या अशाच राजकारण्यांची संख्या वाढली आहे. असच एक प्रकरण समोर आलय. राखी गुप्ता नावाच्या एका महिला नेत्याला खोटी माहिती दिल्यामुळे महापौरपद गमवाव लागलंय.
निवडणूक आयोगाला मुलांबाबत चुकीची माहिती दिल्याच स्पष्ट झाल्यानंतर राखी गुप्ता यांना महापौरपदावरुन बर्खास्त करण्यात आलं. त्या बिहार छपराच्या महापौर होत्या.
कधी जिंकलेली निवडणूक?
राखी गुप्ता यांनी तीन मुलं असल्याच सिद्ध झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने त्यांना महापौरपदावरुन बर्खास्त केलं. निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली म्हणून राखी गुप्ता विरुद्ध नगरपालिका कायदा 2007 अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. राखी गुप्ता यांनी मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात नगर निगम निवडणुकीत महापौरपदाची निवडणूक जिंकली होती.
मुलांबद्दल चुकीची माहिती दिल्याच कसं समजलं?
राखी गुप्ता यांना तीन मुलं आहेत. एका मुलाला जन्मानंतर त्यांनी लिखित स्वरुपात नि:संतान असलेल्या नातेवाईकाला दत्तक दिलं होतं. पण निवडणूक आयोगाचा नियम आहे, मुल दत्तक दिल्यानंतरही ते मूल जैविक मात्या-पित्याचच मानलं जातं. रजिस्ट्री ऑफिसच्या कार्यालयातून माहिती मिळाली. त्यातून छपराच्या महापौरांना तीन मुलं असल्याच स्पष्ट झालं. राखी गुप्ता यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. श्रीयांशी प्रकाश, शिवंशी प्रकाश आणि मुलगा श्रीश प्रकाश बद्दलची माहिती समोर आली.
मॉडलिंग सुद्धा केलय
कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राखी गुप्ता निवडणूक लढवून पहिल्याच प्रयत्नात महापौर बनल्या. त्यांनी मॉडलिंग सुद्धा केलय. 2021 मध्ये i-glam मिसेज बिहार 2021 मध्ये त्या दुसऱ्या स्थानावर होत्या. राखी यांनी लखनऊ यूनिवर्सिटीमधून MBA केलय. राखी गुप्ता यांच्या कुटुंबातील कोणाचा दूर-दूरपर्यंत राजकारणाशी संबंध नव्हता. कोरोना काळात त्यांचा नवरा वरुण प्रकाश यांनी लोकांची भरपूर मदत केली. राखी यांच्या कुटुंबाचा सोन्याचा व्यवसाय आहे. कोरोनानंतर त्या राजकारणात सक्रीय झाल्या.
राजकारणात जोरदार एन्ट्री
राखी गुप्ता यांचा नवरा भाजपाशी संबंधित आहे. महापौर बनण्याआधी राखी नवऱ्याला सुवर्ण व्यवसायात मदत करायची. भाजपाच समर्थन लाभलेल्या राखी गुप्ता यांनी राजकारणात जोरदार एन्ट्री केली होती. 17389 मतांनी निवडणूक जिंकली होती. राजकारणात हा मोठा विजय मानला जातो. पण आता चुकीच्या माहितीमुळे त्यांना पदावरुन हटवण्यात आलय.