सोशल मीडियाने मुले अनसोशल बनत आहेत ? केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, पाहा काय घडले…
सोशल मीडियामुळे लहानग्यांच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांमध्ये वाढ होत आहे. या संदर्भात केंद्र सरकार अधिक कठोर झाले आहे. या संदर्भात नवा कायद्याच्या मसुदा तयार करण्यात आला आहे. सरकारच्या या पावलाने सोशल मीडियापासून मुलांना दूर ठेवणे का गरजेचे आहे ? याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
म्हाताऱ्यांपासून अगदी लहान मुलं घरोघरी मोबाईल पाहत बसलेली असतात. लहान मुले रडू नयेत म्हणून मुलांचे पालक देखील बिनधास्त मोबाईल देतात. त्यामुळे लहान मुलांना मोबाइलचं अगदी व्यसन झाले आहे. यामुळे लहान मुलांनी मैदानात खेळणे बंद केले आहे. भारतात १८ वर्षांखालील मुलांना आता सोशल मीडियावर खाते उघडण्यासाठी पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. केंद्र सरकारने या कायद्याचा मसुदाही तयार केला आहे. त्यामुळे लहान मुलांना सोशल मीडियापासून दूर का ठेवले जात आहे. यावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. याचे फायदे आणि तोटे काय ? अन्य देशात या संदर्भात काय नियम नाही आहे ? या बंदीमध्ये लहान मुलांचे अधिकार दडपले जात आहेत का ? या टेक्नॉलॉजी कंपन्यांचे काय म्हणणे आहे.
सोशल मीडियाचा लहान मुलांवर काय परिणाम होतोय या संदर्भात अनेक तज्ज्ञांनी वेळोवेळी मते मांडली आहेत. याचा लहानमुलांच्या मनावर वाईट परीणाम होत आहेत. लहान मुले असे कंटेट पहात आहेत त्याचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगभरात १० टक्क्यांहून अधिक किशोरवयीन मुलांवर सोशल मीडियाच्या वापराने नकारात्मक प्रभाव होतो आहे. जागतिक पातळीवर जसजसा सोशल मीडियाचा प्रभाव होतो आहे. तसतसा मुलांच्या मानसिक आणि शारीरिक समस्येत वाढ होत आहे.
कोणत्या देशांनी घातली बंदी
लहान मुलांकडून सोशल मीडियाच्या होणाऱ्या वापरावर जगभरात अनेक वर्षांपासून चर्चा आणि वादविवाद होत आहेत. परंतू ऑस्ट्रेलियाने सर्वात आधी त्यांच्या देशातील १६ वर्षांहू कमी वयाच्या मुलांचा सोशल मीडियावर वावर कायद्याने बंद केला आहे. लहान मुलांवर वाईट परिणाम करणारे कंटेट बनविणाऱ्यांवर कायदेशीर बडगा उगारण्याची तरतूदही या कायद्यात ऑस्ट्रेलियाने केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयानंतर अनेक देशांनी अशा कायद्याची गरज असल्याचे म्हटले आहे. न्युझीलंडने देखील लहान मुलांवर सोशल मीडियाचा दुष्परिणाम रोखण्यासाठी नवीन कायदा करण्याची घोषणा केली आहे. इंडोनेशिया, मलेशिया, साऊथ कोरिया, जपान, बांगलादेश, सिंगापुर सह अनेक देशात असा कायदा करण्यासंदर्भात साधक-बाधक चर्चा सुरु आहेत. टेक कंपन्यांना देखील या कायद्याच्या घेऱ्यात आणण्याची तयारी सुरु आहे. ब्रिटन,अमेरिकेतील फ्लोरिडा, नॉर्वे आणि फ्रान्स सारख्या ठिकाणी सोशल मीडियाच्या वापरावर निर्बंध घातले आहेत.