मोदी सरकारने रद्दीच विकून कमवले 254 कोटी रुपये; मिळालेल्या रक्कमेतून केले हे काम…
मंत्रालयातून हा कचरा विकल्यानंतर मोदी सरकारला त्यातून मोठी रक्कम आणि रिकामी जागाही मिळाली आहे.
नवी दिल्लीः मोदी सरकारने 2014 मध्ये स्वच्छ भारत मिशन सुरू केले होते. त्यामुळे त्याअंतर्गत सरकारने आपल्या मंत्रालयांच्या विभागांमध्ये स्वच्छतेची काळजी घेतली होती. त्यामुळे या प्रकरणांतर्गतच गेल्या तीन आठवड्यांपासून कचरा मंत्रालयातील रद्दी विक्रीचे काम हाती घेण्यात आले आहे. यादरम्यान केंद्र सरकारच्या सरकारी कार्यालयातून फाइल्स, ई-कचरा आणि फर्निचरची विक्री करण्यात आली आहे. या रद्दीच्या विक्रीतून सरकारने सुमारे 254 कोटी रुपये कमावले असल्याचे सांगण्यात आले आहे.
मंत्रालयातून हा कचरा विकल्यानंतर मोदी सरकारला त्यातून मोठी रक्कम आणि रिकामी जागाही मिळाली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणच्या या रद्दीच्या फाईल्स काढून विकल्या गेल्या.
त्यावेळी सेंट्रल व्हिस्टाएवढी सुमारे 37 लाख चौरस फूट जागाही रिकामी झाली होती. त्यामुळे इंडिया पोस्टच्या कार्यालयात अशाच रिकाम्या जागेवर कर्मचाऱ्यांसाठी कॅन्टीन आणि भव्य गॅलरी बनवण्यात आली असून, ती आता खूपच आकर्षक झाली आहे.
इंडिया पोस् खात्याकडून या कॅन्टीनचे नावही ठेवण्यात आले आहे. चीफ पोस्ट मास्टर जनरल मंजू कुमार याबद्दल म्हणाले की, एकेकाळी ही जागा कचऱ्याने भरलेली होती. कचरा, खराब एसी, कुलर, कॉम्प्युटर आणि इतर खराब फर्निचरमुळे ही जागा व्यापून गेली होती.
तसेच उपमहासंचालक अमरप्रीत दुग्गल यांनीही याबद्दल माहिती सांगताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता मोहिमेतून ही आयडिया सुचली. त्यामुळे रद्दी विकून लाखोंची कमाई झाली असून येथे एक सुंदर कॅन्टीन आणि भव्य गॅलरीही बनवण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या अनेक कार्यालयांमध्ये यावेळी स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय पोस्टाच्या सुमारे 18 हजार, रेल्वेच्या 7 हजार स्थानक, औषधनिर्माण विभागाच्या 6 हजार, संरक्षण विभागाच्या 4 हजार 500, गृह मंत्रालयाच्या सुमारे 4,900 फाईल्सचा समावेश होता.
त्यामुळे आता सरकारी कार्यालयातील रिकाम्या जागा कोणत्या ना कोणत्या मार्गाने वापरात येऊ शकतात हे आता सरकारच्या लक्षात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.