ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका कायम; मोदी सरकारचा मोठा निर्णय

यापूर्वी केंद्र सरकारने 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटन आणि भारतातील हवाई सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतला होता. | UK flights

ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका कायम; मोदी सरकारचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 12:49 PM

नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा जगभरात वेगाने फैलाव होत असल्यामुळे मोदी सरकारने ब्रिटनवरील (United Kingdom) हवाई निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटन आणि भारतातील हवाई सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका लक्षात घेता आता केंद्र सरकारने ब्रिटनवरील हवाई निर्बंधाचा कालवाधी 7 जानेवरीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली. (India extends suspension of UK flights till january 7 amid worries over new coronavirus strain)

गेल्याच आठवड्यात 21 डिसेंबरला केंद्र सरकारने ब्रिटनमध्ये येणारी आणि जाणारी हवाई सेवा खंडित केली होती. त्यानंतर ब्रिटनहून मुंबईत आलेल्या विमानांमधील प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले होते.  या सर्व प्रवाशांची विमानतळावर कोरोना चाचणी करण्यात आली होती. सुदैवाने महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण सापडलेला नाही.

SARS-CoV-2 या कोरोनाच्या नव्या प्रजातीचा शिरकाव भारतात झाला आहे. जवळपास 20 भारतीय नागरिकांना या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे. आतापर्यंत डेन्मार्क, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, इटली, फ्रान्स, स्‍वीडन, स्वित्झर्लंड, स्‍पेन, कॅनाडा, जर्मनी, लेबनॉन, जपान आणि सिंगापूर या देशांमध्ये नव्या कोरनाचा शिरकाव झाला आहे.

भारतात आढळलेल्या 20 रुग्णांपैकी तीन जण बंगळुरु दोन हैदराबाद आणि एक रुग्ण पुणे येथील आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये एका मुलीलासुद्धा कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे. ही मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत ब्रिटनहून भारतात परतली होती.

पुण्यात 109 प्रवाशांची माहिती मिळेना

गेल्या 15 दिवसांत ब्रिटनमधून पुण्यात काही नागरिक आले आहेत. एकूण 109 नागरिकांचा येथील प्रशासन शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार यापैकी काही नागरिकांच्या घराचा पत्ता प्रशासनाकडे आहे. तर काही प्रवाशी फोन उचलत नाहीयेत. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क करणे अवघड होऊन बसले आहे. ब्रिटनहून काही प्रवासी मुंबईला उतरले. त्यांनतर ते पुण्याला आले. आम्ही या प्रवाशांना ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही, असे पुणे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

संबंधित बातम्या:

New Delhi | कोरोना स्ट्रेन विषाणूपासून बचावासाठी भारत-ब्रिटन विमानसेवा बंद

भारतात नव्या कोरोनाचे 20 रुग्ण, ब्रिटनहून पुण्यात आलेल्या 100 जणांचा पत्ता लागेना

एकही प्रवासी थेट घरी सोडणार नाही, सक्तीने क्वारंटाईन करणार, BMC आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये

(India extends suspension of UK flights till january 7 amid worries over new coronavirus strain)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.