Narendra Modi : मोदींचा भीमावरम दौरा; थोर क्रांतीकारक अल्लुरी सीताराम राजूंच्या पुतळ्याचे अनावरण, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डीही उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशमधील भीमावरम शहराला भेट दिली. मोदींच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
हैदराबाद : हैदराबादमध्ये (Hyderabad) भाजपाच्या (BJP) राष्ट्रीय कार्याकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या दोन दिवशीय बैठकीला पंतप्रधान नरेद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे देखील उपस्थित होते. ही बैठक संपल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदी आंध्र प्रदेशमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी भीमावरम शहराला भेट दिली. इथे आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून नरेद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. भीमावरममध्ये अल्लुरी सीताराम यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांचा 30 फूट उंचीचा कास्ंय पुतळा उभारण्यात आला आहे. . या पुरतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. हा पुतळा उभारण्यासाठी माध्यमांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार तीन कोटी रुपये इतका खर्च आला आहे. या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी, केंद्रीय मंत्री किशन रेड्डी, राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन आणि अभिनेता चिरंजीवी यांची उपस्थिती होती.
कोण आहेत अल्लुर सीताराम राजू?
अल्लुरी सीताराम राजू हे एक स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतीकारक होते. त्यांनी ब्रिटिशांविरोधात लढा उभारला होता. त्यांच्या या लढ्यात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते. पूर्व गोदावरी आणि विशाखापट्टणमचा सिमावर्ती भाग हे अल्लुरी सीताराम राजू यांचे कार्यक्षेत्र होते. त्यांनी ब्रिटिशांवर गनिमी काव्याने हल्ला करून त्यांना सळो की पळो करून सोडले होते. अल्लुरी सीताराम राजू हे पोलीस ठाण्यांवर देखील छापेमारी करत असत. तिथून लूटलेल्या वस्तुचीं एक यादी ते आपल्या सहीसह मागे ठेवायचे आणि पोलिसांना पकडण्याचे आव्हान करायचे. अखेर एक दिवस त्यांना चिंतापल्लीच्या जंगलात पकडण्यात आले. त्यानंतर त्यांची गोळ्या झाडून इंग्रजांनी हत्या केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अल्लुरी सीताराम राजू यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
The 125th birth anniversary of Alluri Sitarama Raju Garu and the 100th anniversary of Rampa Kranti will be celebrated throughout the year: PM Modi pic.twitter.com/dkAgcliXB4
— ANI (@ANI) July 4, 2022
पक्षाचे कार्य मुस्लीम, ओबीसी, वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हैदराबादमध्ये झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्याकारिणीच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पक्ष करत असलेले कार्य मुस्लीम, ओबीसी आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी यावेळी घराणेशाहीवर देखील जोरदार टीका केली. देशातील नागरिकांनी घराणेशाही मोडीत काढल्याचे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच ज्या पक्षांना अपयश येते, त्यांची खिल्ली उडवण्यापेक्षा त्यांना अपयश का आले या कारणांचा शोध घ्या आणि त्यतून शिका असे देखील मोदी यांनी म्हटले आहे.