Haryana Election Result : मोदींची लाट ओसरली? हरियाणातील पराभवाची 5 कारणे काय? पहिलं आणि पाचवं कारण म्हणजे मोठी वॉर्निंग?

Haryana Assembly Election Result 2024 : हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 ची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीचे अंदाज काँग्रेस पक्षाच्या पारड्यात आहेत तर भाजपा पिछाडीवर दिसत आहे. मुख्यमंत्री नायब सिंह सैनि, भूपिंदर सिंह हुड्डा, रणजीत सिंह चौधरी, दुष्यंत चौटला यांच्यासह अनेक दिग्गजांचा फैसला आज होईल.

Haryana Election Result : मोदींची लाट ओसरली? हरियाणातील पराभवाची 5 कारणे काय? पहिलं आणि पाचवं कारण म्हणजे मोठी वॉर्निंग?
भाजपवर मतदारांची नाराजी?
Follow us
| Updated on: Oct 08, 2024 | 10:56 AM

हरियाणातील जवळपास सर्व 90 जागांचे अंदाज समोर आले आहेत. यामध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजपने पण मुसंडी मारली आहे. एकूणच हरियाणात काँटे की टक्कर दिसत आहे. मुख्यमंत्री नायब सिंह सैनि, भूपिंदर सिंह हुड्डा, रणजीत सिंह चौधरी, दुष्यंत चौटला, विनेश फोगाट यांच्यासह अनेक दिग्गजांचा फैसला आज होईल. भााजपची गेल्या दहा वर्षांपासून सत्ता या राज्यात असताना आणि डबल इंजिन सरकार असताना भाजपवर मतदारांची नाराजी का ओढावली? याचे आता विश्लेषण सुरू झाले आहे.

कोण ठरणार कुरूक्षेत्राचे पांडव?

सकाळच्या मतमोजणीच्या कलानुसार, काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. तर आता आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भाजपने पण विजयाचा शंखनाद केला आहे. सर्वच एक्झिट पोलने काँग्रेसच्या पारड्यात मत टाकले आहे. तर भाजप 20-28 जागांवर दमखम दाखवण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे भाजपच्या या हाराकिरी मागील कारणांचा शोध घेण्यात येत आहे. आता हरियाणाच्या कुरूक्षेत्राचे पांडव कोण होणार हे अवघ्या काही तासात समोर येईल.

हे सुद्धा वाचा

हरियाणात भाजपाची हाराकिरी का?

1. सत्ते विरोधात लोकमत – भाजपला या विधानसभा निवडणुकीत डबल डेकर सरकार असताना सुद्धा अँटी इनकम्बन्सीचा फटका बसल्याचे समोर येत आहे. सत्तेविरोधातील लाटेचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता खरी होताना दिसत आहे. याचा अंदाज केंद्रीय नेतृत्वाला अगोदरच आल्याने भाजपाने तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना बाजूला सारले. पण हे पाऊल पण चुकीचे ठरल्याचे सध्यास्थितीवरून दिसून येते. संघटनात्मक बदलाचा मोठा फायदा दिसून आला नाही.

2. बेरोजगारी महत्त्वाचा मुद्दा

बेरोजगारीचा मुद्दा निवडणूक प्रचारात महत्त्वाचा ठरला. विरोधी पक्षांनी त्याचा जोरदार वापर केला. हरियाणात बेरोजगारी दर 2021-22 मध्ये 9 टक्के होता. हा दर राष्ट्रीय दराच्या दुप्पट आहे. राष्ट्रीय बेरोजगारी दर 4.1 टक्क्यांचा घरात आहे. यापूर्वी निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने 2 लाख नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात 1.84 लाख जागा रिक्त होत्या. या काळात 47 परीक्षा या ना त्या कारणाने रद्द करण्यात आल्या. त्याचा फटका भाजपाला बसल्याचे सध्या तरी दिसत आहे.

3. शहरी भागातील मतदारांची नाराजी

भाजपाच्या परंपरागत शहरी मतदाराची मोठी नाराजी असल्याचे राजकीय पंडित पूर्वीपासून सांगत होते. शहरी भागातील मतदारांवर कराचा बोजा आणि महागाईचा फटका असा दुहेरी मार सुरू आहे. कर सवलती न मिळाल्याने देशभरातील शहरी करदाते नाराज आहे. हरियाणा निवडणुकीत शहरी भागातील मतदान कमी झाले आणि प्रभावित झाल्याचे दिसून आले.

4. सरकारी सुविधांची बोंबाबोंब

सरकारने अनेक योजनांची जंत्री वाचली. त्यांचा टेंभा मिरवला. ई-गव्हर्नेंसची स्वप्न दाखवली. पण अनेक गावापर्यंत या योजना काही पोहचल्या नाहीत. ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले, पण इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने त्याचा फायदा नागरिकांना घेता आला नाही.

5. अनेक योजना कागदावरच

भाजपाने घोषणा केलेल्या अनेक योजना या राज्यात कागदावरच राहिल्या. त्यातील काही योजना राबविण्यात यंत्रणा कमी पडल्याचे दिसून आले. शेतकरी वर्ग नाराज दिसली. 24 पिकांना हमीभाव देण्याची योजना हवेतच राहिली. त्याचा फायदा त्यांना होतो. अग्निवीर हा उत्तर भारतातील सर्वात त्रासदायक विषय ठरला आहे. त्यामुळे जनतेची नाराजी दिसून आली.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.