उधार देणारा गणपती… देशातील या अनोख्या गणेशाची कहाणी माहीत आहे काय?
श्री गणेशाला चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती म्हटले जाते. काही गणपतीची नावे खूपच वेगळी असतात तर काही गणपती नवसाला पावण्याबद्दल खूपच प्रसिद्ध आहेत.
उदयपूर शहराच्या मध्य भागी असलेले गणेशजी मंदिर त्यांच्या चमत्कारामुळे संपूर्ण राजस्थानात प्रसिद्ध आहे. या मंदिरात स्थापन झालेले गणेशजी लोकांना पैसे देणारे म्हणून ओळखले जातात. येथे भाविक उधार मागण्यासाठी रांगा लावतात…राजस्थानातील उदयपुर शहराच्या मध्यभागी हे चमत्कारी मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिरातील गणरायाला पैसे देणारा देव म्हणून ओळखले जाते. बोहरा गणेश मंदिरात कोणी डोके टेकवून प्रार्थना केली की ती नक्कीत फलद्रुप होते. भक्तांना कधीच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही.
देशात सध्या गणेशाच्या आगमनामुळे अनेक जागी सार्वजनिक मंडपात गणेशाच्या मूर्ती आणून त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या मंडळात गणेशाच्या दर्शनासाठी मोठ मोठ्या रांगा लागल्या आहेत. परंतू उदयपूरातील प्रसिद्ध बोहरा गणेश मंदिरात भक्तांची गर्दी वाढली आहे. या मंदिराला 300 हून अधिक वर्षे झाली आहेत. या मंदिराचा इतिहास ऐकूण कोणीही आश्चर्यचकीत होईल. पुजारी आणि मंदिराच्या संबंधित लोक म्हणतात की कोणालाही घरात काही शुभ कार्य करायचे असेल आणि पैशाची अडचण असली तर या मंदिरात उधार पैसे मागितले जातात. त्यानंतर गणेश त्यांनी उधार देतात. आणि भक्त देखील काम झाल्यानंतर हे पैसे न चुकता परत करतात.
देवाकडे उधार मागायला येतात लोक
महाराणा मोकल सिंह यांच्या काळात बनविलेले हे मंदिर तीनशे वर्षांहून अधिक काळ जुने आहे. येथील पुजारी सांगतात की शतकांपूर्वी येथे स्थापित झालेले गणराय लोकांना अडचणीत मदत करत आले आहेत. गरजवंत लोक घरात काही शुभ कार्य करण्यासाठी जर तंगी असेल तर येथे पैसे मागायला पोहचतात. गणराय त्यांच्या हाकेला ओ देतात. आणि सढळ हस्ते उधारी देतात.लोकांकडे पैसे आले तर लोक उधार घेऊन गेलेले पैसे परत करतात.
असे झाले नामकरण
जुन्या काळात उधार देणाऱ्यांना बोरा म्हटले जायचे. यामुळे या गणेशाला बोरा गणेशजी असे नाव पडले. त्यानंतर त्यांच्या नावाचा अपभ्रंश होऊन त्यांचे नाव बोहरा गणेशजी असे पडले.आता उधारीने पैसे देण्याचा क्रम बंद पडला, परंतू शुभकार्यासाठी आज देखील श्री गणेशाजींच्या समोर माथा टेकवून दर्शन घेत त्या शुभ कार्याचा प्रारंभ केला जातो.गणेशोत्सवात भगवान बोहरा गणेश जींचा विशेष श्रृंगार केला गेला आहे. या दिवसात गणेशाला लाडूचा नैवेद्य दाखवला जातो. बोहरा गणेश मंदिर पहाटे 4 वाजल्यापासून उघडे जाते. त्यानंतर भक्तांची येथे रिघ लागते.