Viral Video | लहान मुलावर माकडांचा निर्दयी हल्ला; नेटिझन्स संतापून म्हणाले, ‘ते त्यांचे मूल असते तर?’
मथुरा येथे काही माकडांनी एका लहान मुलावर क्रूरपणे हल्ला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही घटना जवळच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मात्र, यावरून नेटिझन्सच्या संतापाचा पारा चढला आणि त्यांनी त्या दोन महिलांना 'ते त्यांचे मूल असते तर?' असा थेट सवाल केलाय.
उत्तर प्रदेशातील मथुरा येथे माकडाशी संबंधित आणखी एक हल्ला उघडकीस आला आहे. यामुळे माकडांचे प्राणघातक हल्ले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मथुरा येथील एक मुलगा रस्त्यावरून धावत जात होता. याचवेळी काही माकड भडकले आणि त्यांनी त्या मुलावर निर्दयी हल्ला केला. त्या माकडांनी त्याला चावण्यास सुरुवात केली. काही वाटसरू त्या असहाय मुलाला मदत करण्यासाठी धावून आले. त्यामुळे त्या मुलाची सुरक्षित सुटका झाली. जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ लगेच व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दोन महिलांवर नेटिझन्सनी संताप व्यक्त केला.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर हा व्हिडिओ ‘घरा के क्लेश’ या हँडलद्वारे शेअर करण्यात आला आहे. मथुरेत माकडांची दहशत, माकडांनी 5 वर्षाच्या निष्पाप मुलावर हल्ला केला. स्थानिक लोक त्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी धावले. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली थेट घटना.” असे या पोस्टला कॅप्शन देण्यात आले आहे.
सोशल मिडीयावर हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर लगेचच तो व्हायरल झाला. लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. बहुतेकांनी लहान मुलाजवळच्या दोन महिलांकडे लक्ष वेधले. ज्यांनी लहान मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पळ काढला. काही नेटकऱ्यांनी या महिलांना ‘असंवेदनशील’ म्हटले आहे. काहींना त्या मुलाबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.
Monkey terror in Mathura, monkeys attacked a 5-year-old innocent child, local people ran to save the child's life, live incident captured on CCTV pic.twitter.com/T7u860Kk6J
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 14, 2024
नेटिझन्सने या व्हिडिओवरील कमेंट विभागात आपली त्यांचे मते शेअर केली आहेत. “त्या महिलांनी मुलाला वाचवण्याचा प्रयत्नही केला नाही. किती असंवेदनशील असे एक वापरकर्ता म्हणाला आहे. तर, “मुलाला संकटात पाहिल्यानंतरही ज्या महिला तोंड लपवून पळून गेल्या त्या समाजाच्या सर्वात मोठ्या शत्रू आहेत,” असे दुसरा युजर म्हणाला.
एका युजरने ‘त्या आंटी अधिक चांगले करू शकल्या असत्या’ असे म्हटले आहे. तर आणखी एकाने ‘आमच्या मावशींचा आदर कमी झाला! मोठी लाज वाटते’ अशी टीका केली आहे. एक युजरने संताप व्यक्त करताना ‘त्या स्त्रिया कशा पळून जाऊ शकतात? ते त्यांचे मूल असते तर? असा थेट सवाल केला आहे.