मोरबी पूल दुर्घटनेनंतर बांधकाम कंपनीची पोलखोल, अहवालात धक्कादायक खुलासा…
हा अपघात म्हणजे देवाच्या कायद्यानुसार घडला आहे मात्र त्या झुलत्या पुलाच्या तारांना गंज चढला होता आणि त्या सुस्थितीतही नव्हत्या असंह त्यांनी सांगितले.
अहमदाबादः गुजरातमधील मोरबी पुलाची दुर्घटना घडून गेल्यानंतर आता त्याप्रकरणी एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या प्रकरणी अतिरिक्त सरकारी वकील आणि अभिव्यक्ता वकील एच. एस. पांचाल यांनी मोरबी पुलाचे पुनर्निर्माण करणाऱ्या ओरेवा कंपनीच्या व्यवस्थापकांनी हा अपघात म्हणजे देवाचा कायदा असल्याचे म्हटल्याचा त्यांनी त्यांच्यावर आरोप केला आहे. त्याबरोबरच कंपनीवर पुनर्निर्माणबाबत हलगर्जीपणा केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे.
मोरबी पुलाच्या दुर्घटनेनंतर अतिरिक्त सरकारी वकील पांचाळ यांनी ओरेवा कंपनीच्या व्यवस्थापकांनी न्यायालयात सांगितलेला मुद्या सांगितला.
ते म्हणाले की या व्यवस्थापकांनी हा अपघात म्हणजे देवाच्या कायद्यानुसार घडला आहे मात्र त्या झुलत्या पुलाच्या तारांना गंज चढला होता आणि त्या सुस्थितीतही नव्हत्या असंह त्यांनी सांगितले.
त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना 5 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये कंपनीच्या दोन व्यवस्थापकानाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालात स्पष्ट पणे उल्लेख करण्यात आला आहे की, झुलत्या पुलाच्या तारांना गंज चढला होता. तर पुलाच्या काही अंशी फक्त काम करण्यात आले होते, मात्र ज्या तारांवर पूल होता.
त्या बदलण्यात आल्या नव्हत्या असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याबरोबरच पुलाच्या तारांनाही तेल आणि ग्रिसिंग लावण्यात आलेच नव्हते असा धक्कादायक अहवालही देण्यात आला आहे.
फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा पूल जुन्या केबल्सवरच आधारलेला होता. त्यामुळे पुलाच्या साहित्याची आता तपासणी केली जात असून पुलाशी संबंधित असलेल्या अनेक व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सध्या 4 जणांना ताब्यात घेतले असून त्यातील दोघे जण हे ओरेवा कंपनीचे व्यवस्थापक असून अन्य दोघं पुलाच्या बांधकामाचे काम केले होते. त्याबरोबर पुलावर असलेला सुरक्षा कर्मचारी आणि तिकीट विक्रेत्यांचाही त्यामध्ये समावेश असून त्यांच्याकडून माहिती काढून घेतली जात आहे.
मोरबी पुलाची दुर्घटना घडून गेल्यानंतर ज्या 135 लोकांचा जीव जाण्यास जी लोकं कारणीभूत होती. त्या 9 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यापैकी, 4 जणांना 5 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. द्या दोघांना बांधकाम प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांनी पुलाच्या दुरुस्तीनंतर पूल पाहण्यासाठी खुला केला होता.