नदी पार करताना मगरीचा जीवघेणा हल्ला, मृत्यूच्या दाढेतून आईने मुलाची केली अशी सुटका !

मगरीच्या जबड्यात अडकलेल्या मुलाची सुटका करण्यासाठी त्याच्या आईने प्रयत्नांची शर्थ केली. स्वत:च्या जीवाचीही पर्वा न करता ती फक्त मुलाला वाचवण्यासाठी लढत होती.

नदी पार करताना मगरीचा जीवघेणा हल्ला, मृत्यूच्या दाढेतून आईने मुलाची केली अशी सुटका !
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 5:30 PM

पाटणा | 8 सप्टेंबर 2023 : आईचं प्रेम हे जगावेगळंच असतं. इतकं नितळ आणि निस्वार्थी प्रेम जगात दुसर कोणीच करू शकता नाही. मुलांसाठी आई काहीह करू शकते. प्रसंगी ती जगाशीही लढू शकते आणि गरज पडली तर मृत्यूशी देखील लढा देऊ शकते. याचंच एक जिवंत उदाहरण नुकतंच बिहारमध्ये पहायला मिळालं. तेथे एका आईने  (mother saved son from crocodile) आपल्या मुलाला वाचवण्यासाठी मगरीशी लढा दिला. पश्चिम चंपारणच्या सुरवा बारी गावात नदी ओलांडताना एका अल्पवयीन मुलावर मगरीने हल्ला केला. त्यानंतर त्या मुलाच्या आईने मगरीशी झुंज देत मुलाची मृत्यूच्या दाढेतून सुटका केली.

सध्या या मुलाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंडक नदीत मोठ्या प्रमाणावर मगरी आहेत. पावसाळ्याच्या दिवसात येथे मगरींचा वावर वाढतो, ज्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

नक्की काय घडलं ?

अवघ्या 11 वर्षांचा नितीश हा मुलगा लोकरिया सुरवा बारी गावाच्या मध्यातून वाहणारा त्रिवेणी कालवा ओलांडत असताना होता. तेवढ्यात त्याच्यावर मगरीने हल्ला केला. मुलगा मगरीच्या जबड्यात सापडल्याचे पाहून त्याची आई धास्तावली पण तिने हिंमत न हारता त्या मगरीचा सामना केला आणि मुलाची तिच्या जबड्यातून सुटका केली. तिने स्वत:च्या जीवाची देखील पर्वा केली नाही.

काठीने केला मगरीवर हल्ला

पीडित मुलगा व त्याची आई शेतात जाण्यासाठी निघाले होते. तेव्हाच कालवा ओलांडत असताना चुकून नितीश कुमारचा पाय एका मगरीवर पडला. त्यामुळे क्रोधित मगरीने त्याच्यावर हल्ला करत झडप घातली. हे पाहून त्याची आई त्याच्या बचावार्थ पुढे आली. तिने लाठी घेऊन मगरीवर हल्ला केला आणि तिला मारू लागली. त्यामुळे मगरीने नितीशला सोडले . अशा प्रकारे त्या आईने अत्यंत धैर्याने मगरीचा सामना करत मुलाला वाचवले.

मुलावर सुरू आहेत उपचार

या घटनेनंतर महिलेने मुलाला उपचारांसाठी लगेचच प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असून मुलाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरानी सांगितले.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.