माता ‘सीता की रसोई’, सर्व राजपुत्रांसह इथे आहेत त्यांच्या पत्नींच्या मूर्ती, कुठे आहे हे ठिकाण?
रामायणातील काही प्रसंगांच्या पाऊलखूणा आजही अयोध्येत सापडतात. त्यातील एक म्हणजे माता 'सीता की सरोई'. तसेच, भारत मिलाप मंदिर देखील इथे पाहायला मिळते.
अयोध्या | 03 जानेवारी 2024 : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे. या ऐतिहासिक दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी देशातील तसेच जगभरातूनही लोक येत आहेत. रामलल्लाच्या अयोध्या नगरीत अनेक महाल आणि मंदिरे आहेत. त्यांना भेट देण्यासाठीही अनेक लोक येथे येतात. यापैकी एक ठिकाण म्हणजे माता ‘सीता की सरोई’. उत्तर प्रदेशातील मंदाकिनी नदीच्या काठावर चित्रकूट धाम आहे. येथे माता सीतेने आपला बहुतेक वेळ घालवला. या धाममध्येच माता सीतेचे स्वयंपाकघर आहे. माता सीता इथे स्वयंपाक करायच्या आणि महर्षी ऋषींना भोजन द्यायच्या. त्यामुळे त्यांना अन्नपूर्णा माता असे नाव पडले.
चित्रकूट धामचा इतिहास हजारो वर्षे जूना आहे. लाखो भाविक इथे भगवंताच्या दर्शनासाठी येतात. कामद गिरी नावाचा येथे पर्वत आहे. या पर्वताला प्रदक्षिणा घालणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. रामायणातील काही प्रसंगांच्या पाऊलखूणा आजही अयोध्येत सापडतात. त्यातील एक म्हणजे माता ‘सीता की सरोई’.
राम मंदिराच्या उत्तर – पश्चिम भागात सीतेचे हे स्वयंपाकघर आहे. विशेष म्हणजे हे शाही स्वयंपाकघर नाही तर ते एक साधे मंदिर आहे. या स्वयंपाकघरात सीता मातेची काही भांडी अजूनही जपून ठेवली आहेत. त्याशिवाय आणखी काही वस्तू येथे पाहायला मिळतात. तसेच, भारत मिलाप मंदिर देखील इथे पाहायला मिळते. वनवासात असताना बंधू भरत यांनी श्रीराम यांना वनवास सोडून परत या आणि अयोध्येची गादी सांभाळा, अशी विनंती केली. त्या कथेची महिमा सांगणारे हे स्थळ आहे.
माता सीता की रसोई हे शाही स्वयंपाकघर नसून एक मंदिर आहे. या स्वयंपाकघरात राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्यासोबत सीता, उर्मिला, मांडवी आणि सुकृती यांच्या मूर्ती आहेत. तसेच, सीता मातेचे पोळपाट लाटणे, चूल, इतर मातीची भांडी देखील आहेत.
अयोध्यामध्ये रामायण काळात बांधल्या गेलेली अशी अनेक प्राचीन आणि पौराणिक स्थाने, इमारती किंवा घरे आहेत. यातीलच एक पौराणिक ठिकाण म्हणजे ‘सीता की सरोई’. याच स्वयंपाक घराशेजारी एक जानकी कुंड देखील आहे. असे म्हणतात की माता सीता या तलावामध्ये स्नान करत. खास करून महिला वर्गामध्ये या दोन्ही ठिकाणाचे विशेष आकर्षण आहे.