ओव्हरटाईम करण्याआधीच आयटी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना असा मेसेज, ऐका नाही तर…!
नोकरी करणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यावर कामाचा ताण असतो. हा ताण घेऊन प्रत्येक कर्मचारी वावरत असतो. यामुळे अनेकदा कर्मचारी मानसिकरित्या आजारी देखील पडतात. मंडे मोटिवेशन आणि फन फ्रायडेची लोकं आतुरतने वाट पाहतात. पण मध्य प्रदेशातील कंपनीने यावर तोडगा काढला आहे.
मुंबई : नोकरी करणारा प्रत्येक जण तासावर आपलं काम करत असतो. काही कंपन्यांमध्ये आठ तासांची शिफ्ट, तर काही कंपन्यांमध्ये नऊ तासांची शिफ्ट असते. पण नेमून दिलेल्या तासात अनेकदा काम होणं कठीण होतं. त्यामुळे अनेक कर्मचारी काही तास आणखी थांबून काम पूर्ण करतात. मात्र यामुळे त्यांच्या कामावर परिणाम दिसून येतो.वर्क कल्चरबाबत आपण अनेकदा सोशल मीडियावर वाचलं असेलच की, ओव्हरटाईम, कमी पगाराची नोकरी आणि कामाच्या ठिकाणी असलेला ताण यामुळे कामावर परिणाम होतो. इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मुर्ती यांनी याबाबत यापूर्वीही स्पष्टच सांगितलं होतं की, ऑफिसमध्ये काही तास अतिरिक्त काम करून तुम्ही उत्पादन क्षमता वाढवत नाही. नारायण मुर्ती यांचं हेच म्हणणं आता मध्य प्रदेशातील आयटी कंपनीनं मनावर घेतलं आहे. उत्पादन क्षमात वाढणार नाही हे डोळ्यासमोर नव्या नियमाची अंमलबजावणी सुरु केली आहे.
कामाचे तास संपल्या संपल्या काम करत असलेल्या सिस्टमवर एक मेसेज पॉपअप होतो. त्यामुळे कर्मचारी तात्काळ बॅग पॅक करून घरी जाण्याची तयारी सुरु करतात. “सावधान…तुमची शिफ्ट संपली आहे. ऑफिस सिस्टम पुढच्या दहा मिनिटात बंद होणार आहे. कृपया घरी जा”, असा मेसेज पॉपअप होतो. मध्य प्रदेशातील आयटी कंपनी असलेल्या सॉफ्टग्रिड कम्युटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता रोजच हा मेसेज पाहावा लागत आहे.आयटी कंपनी या नियमाचं काटेकोरपणे पालन करत आहे.
आयटी कंपनीमधील एचआरनं लिंकडिनवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने लिहिलं आहे की, “ही पोस्ट प्रसिद्धीसाठी किंवा स्वप्न पाहिल्यासारखी नाही. हे आमच्या ऑफिसचं वास्तव आहे. सॉफ्टग्रिड कम्युटर..ऑफिस तास संपल्यानंतर कोणताही कॉल किंवा मेल येत नाही. हे चांगलं नाही का? मला असं वाटतं की तुम्ही अशा वातावरणात काम करत असाल तर तुम्हा मंडे मोटीवेशन किंवा फन फ्रायडे यासारख्या गोष्टींची उत्साह वाढवण्यासाठी गरज नाही.आम्ही धकाधकीच्या काळात कामाचे तास आणि चांगलं वातावरण करुन दाखवलं आहे”
सोशल मीडियावर कामाच्या ताणात वावरणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. कर्मचाऱ्यांना एक मिनिटंही आपलं आयुष्य जगू शकत नाही. यावरून अधोरेखित होतं. हॉटेल, रेल्वे स्टेशन आणि इतर सार्वजनिक ठिकाणी आपण कर्मचाऱ्यांना काम करताना पाहिलं असेल. इतकंच तर बंगळुरूमध्ये फ्लायओव्हरवर बाइक चालवत असताना एक कर्मचारी काम करत होता. त्यामुळे मध्य प्रदेशातील आयटी कंपनीचा आदर्श आता इतर कंपन्यांसमोर उभा राहणार आहे.
लिंकडिनच्या या पोस्टवर आतापर्यंत 3.2 लाखांहून अधिक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. त्याचबरोबर 9 हजारांहून अधिक लोकांनी ही पोस्ट रिशेअर केली आहे. असं वर्क कल्चर आपल्या कंपनीतही यावं अशी भावना अनेक युजर्संनी व्यक्त केली आहे.