उत्तर प्रदेश : आग्रा येथे पती-पत्नीमधील वादाचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. सदर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या तरुणाचे सुमारे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले. हा तरुण एका खासगी कंपनीत काम करतो. त्याची पत्नीही उच्चशिक्षित आहे. मात्र, पत्नी घरात काम करत नाही. कामचुकारपणा करते या कारणावरून दोघांमध्ये नेहमी वाद होतात. त्यामुळे पत्नीने पती आणि सासू-सासऱ्यांविरुद्ध हुंड्यासाठी छळ करत असल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पती-पत्नीला कुटुंब समुपदेशन केंद्रात समुपदेशनासाठी बोलावण्यात आले. मात्र, समुपदेशकाने विचारलेल्या प्रश्नांना तिने जी काही उत्तरे दिली त्यामुळे समुपदेशकही चक्रावला. त्या महिलेने दिलेले उत्तर आता कौटुंबिक समुपदेशन केंद्रात चर्चेचा विषय बनला आहे.
आग्रा येथे रहाणाऱ्या या जोडप्याचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले. दोघेही उच्चशिक्षित पण लग्नानंतर पत्नी घरातील काम करणे टाळू लागली. त्यामुळे त्या दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. पत्नी घरातील कोणतेही छोटे काम करत नाही. दिवसभर फोनवर व्यस्त असते. या कारणावरून हे वाद होत असत.
सततच्या वादाला कंटाळून पत्नीने थेट सासरच्या लोकांविरोधात तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने दोघांनाही समुपदेशन केंद्रात बोलावण्यात आले. समुपदेशक दोघांशी बोलू लागला. समुपदेशकाने त्या तरुणाच्या पत्नीला काही प्रश्न विचारले. त्यावर तिने काही उत्तरे दिली त्यामुळे समुपदेशकही चक्रावला.
पतीने अशी तक्रार होती की, पत्नी घरातील कोणतेही काम करत नाही. जेवणही बनवत नाही आणि काहीही बोलल्यावर भांडते. समुपदेशकाने पत्नीशी चर्चा केली असता तिने स्पष्ट सांगितले की, तिला स्वयंपाक कसा करायचा हे माहित नाही. त्यामुळे नवरा आणि सासूसाठी जेवण बनवणार नाही.
माझ्या वडिलांनी लग्नात खूप हुंडा दिला. त्यामुळे स्वयंपाक करणार नाही. त्यांना जर जेवण हवे असेल तर त्यांनी स्वत: जेवण बनवावे. त्यांना जमते नसेल तर त्यांनी हुंड्यात मिळालेल्या रकमेत घरात मोलकरीण ठेवा. स्वतः शिजवून खा आणि मलाही खायला द्या असे उत्तर दिले.
महिलेचे हे शब्द ऐकून कुटुंब समुपदेशन केंद्राचे समुपदेशक चक्रावले. महिलेला समजावून सांगण्यासाठी त्याच्याकडे एक शब्दही नव्हता. आता दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर समुपदेशकानी त्या जोडप्याला पुढील आठवड्यात समुपदेशनासाठी बोलावले आहे. पण, ही बाब कौटुंबिक समुपदेशन केंद्रात चर्चेचा विषय बनली.