शिंदे गटाच्या खासदाराने सांगितल्या शहांची भेटीच्या आतल्या गोष्टी, अरविंद सावंत यांना धरले जबाबदार

हाराष्ट्रातील खासदारांनी सीमावादावर अमित शहा यांची भेट घेण्याचे ठरवले त्यावेळी त्यांनी सांगितले की, मी आणि धौर्यशील माने, सुप्रिया सुळे यांच्या विनंतीला मान देऊन शिष्टमंडळासोबत जात होतो.

शिंदे गटाच्या खासदाराने सांगितल्या शहांची भेटीच्या आतल्या गोष्टी, अरविंद सावंत यांना धरले जबाबदार
Follow us
| Updated on: Dec 09, 2022 | 11:44 PM

पिंपरी चिंचवडः मागील महिन्याच्या 24 तारखेपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाची ठिणगी पडली आणि दोन्ही राज्यातील राजकारण ढवळून निघाले. महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी शिंदे गटावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल करत सीमावाद सोडवण्यासाठी केंद्राने मध्यस्ती करावी अशी मागणी केली. त्यानंतर सीमावादासाठी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी केंद्राने मध्यस्ती करावी यासाठी प्रयत्न चालू केले. त्याविषयी बोलताना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आजच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीविषयी सांगताना महाराष्ट्रातील खासदारांमध्ये असलेले मतभेद उघड झाले आहेत.

दिल्लीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सीमावादावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षातील खासदार भेट घेणार होते. मात्र काही गोष्टींवरून मतभेद आणि आक्षेप घेतले गेल्याने ही आजची भेट झाली नाही असं श्रीकांत बारणे यांनी सांगितले.

शिंदे गटाचे खासदार श्रीकांत बारणे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेण्याविषयी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या हितासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र यायला हवं असं मत बारणे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रातील खासदारांनी सीमावादावर अमित शहा यांची भेट घेण्याचे ठरवले त्यावेळी त्यांनी सांगितले की, मी आणि धौर्यशील माने, सुप्रिया सुळे यांच्या विनंतीला मान देऊन शिष्टमंडळासोबत जात होतो.

मात्र ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी आम्हाला सोबत घेण्यासाठी आक्षेप घेतला. त्यामुळे महाराष्ट्रातील खासदारांची आणि अमित शहा यांची भेट होऊ शकली नाही असं त्यांनी बोलून दाखवलं.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता प्रचंड टोकाला पोहचला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यातील राजकारण तापले आहे. तर दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी महाराष्ट्रतील गावांवर दावा सांगितला आहे.

त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळले आहे. या प्रकरणावर चर्चा आणि तोडगा काढण्यासाठीच आज कर्नाटक- महाराष्ट्र सीमा प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या शिष्टमंडळाने अमित शहा यांची भेट घेतली.

यावेळी महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांनी केला होता. मात्र ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी आक्षेप घेतल्याने महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आमदारांची भेट होऊ शकली नाही असं खासदार श्रीकांत बारणे यांनी सांगितले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.